Press "Enter" to skip to content

पनवेलमध्ये कोरोना रुग्णांच्या मृत्यूची डबल शेंच्युरी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आजपर्यंत तब्बल 205 जणांचा कोरोनाने घेतला बळी

सिटी बेल लाइव्ह / पनवेल #

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. रोज रूग्णांच्या संख्ये बरोबर मृत्यू चा आकडा देखील वाढतचं चालला आहे. आजच्या घडीला एकट्या महानगरपालिका क्षेत्रात मृत्यूने डबल शेंच्युरी पार करून 205 जणांचा बळी गेला आहे.

आज महानगरपालिका क्षेत्रात 189 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे तर आज 8 जणांचा मृत्यू झाला आहे. विद्यमान कोरोना रूग्णांची संख्या 1647 इतकी आहे. आज 145 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दरम्यान बरे होऊन घरी सोडण्यात येणार्‍या रूग्णांची डिस्चार्ज च्या आधी पुन्हा कोरोना चाचणी करण्यात येत नसल्याने तो रूग्ण खरंच बरा झाला का ? हा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. कारण ज्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले त्यांनी पुन्हा आपली कोरोना टेस्ट केल्यानंतर ती पाॅझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाला खरचं कोरोना संपवायचा आहे की फक्त नागरीकांच्या जिवाशी खेळ करायचा आहे ? हा प्रश्न विचारण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. परंतु मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण ? महामारी कायद्याच्या बुरख्या आडून मनमानी करणार्‍या प्रशासनाला जाब विचारणार कोण ?

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.