Press "Enter" to skip to content

सिटी बेल लाईव्ह exclusive रिपोर्ट

बेड साठी अशी ही बनवाबनवी #

सतर्क सामाजिक कार्यकर्त्यांमुळे झोल आला बाहेर #

सिटी बेल लाईव्ह/ exclusive #

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे, जसजसा त्याचा फैलाव होत आहे तस तसा सर्वत्र सावळागोंधळ वाढताना दिसून येत आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील covid-19 पॉझिटिव्ह रुग्णांचा विचार केला असता त्यांच्या संक्रमणासाठी मुंबई प्रवासाचा इतिहास कारणीभूत असल्याचे ढळढळीत सत्य समोर येते. ज्या मुंबईने आपल्याला इन्फेक्शन दिले त्याच मुंबईमधील रुग्ण गुपचूप प म पा हद्दी मध्ये येऊन उपचार घेत असल्याचे धक्काजनक वास्तव समोर आले आहे. सतर्क सामाजिक कार्यकर्त्यांमुळे या बनवाबनवी चे भांडाफोड करण्यात यश लाभले आहे.
पनवेल महानगरपालिका रोज सायंकाळी कोविड पॉझिटिव रुग्णांसंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध करत असते. या अहवालामध्ये त्या दिवशी सापडलेल्या पॉझिटिव रुग्णांच्या लोकेशन बाबत सविस्तर माहिती असते. खारघर येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज शरबिद्रे यांना एके दिवशी त्यांच्या सोसायटीत कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याचे या अहवालानुसार समजले. सदर रुग्ण एमजीएम रुग्णालयात दाखल असल्याचे त्यात नमूद केले होते. याबाबत पाठपुरावा केले असता त्यांना समजले की सदर सदनिकेमध्ये नऊ सदस्य राहत असून ते टेस्ट करण्यासाठी नकार देत होते. काही केल्या ते या रुग्ण बाबत किंवा त्याला झालेल्या संक्रमण बाबत माहिती देऊ इच्छित नव्हते. यादरम्यान महानगरपालिकेने येऊन त्यांची सोसायटी सिल केली. झालेल्या घटनांचा कुठेच मेळ बसत नसल्याकारणाने मनोज शारबिद्रे यांनी आणखी खोलात जाऊन पाठपुरावा केला असता असे समजले की, अहवालामध्ये नमूद रुग्ण हा घाटकोपर येथील असून त्यांच्या सोसायटीचा पत्ता केवळ एमजीएम हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा याकरता दिलेला होता. बेड मिळवण्याकरता हॉस्पिटल प्रशासनाला पैसे चारल्याचे देखील या रुग्णाच्या नातेवाईकांनी कबूल केले. वास्तविक एका सजग सामाजिक कार्यकर्त्या मुळे हा प्रकार उघडकीस आला आहे. अन्यथा महानगरपालिकेने सोसायटी सिल केल्यानंतर जो तो आपल्या घरात बसून राहणे पसंत करतो. अनेक मोठमोठ्या सोसायट्यांचे पत्ते देऊन मुंबईतील असे किती रुग्ण आपल्या येथे उपचार घेत आहेत याचा शोध घेणे हीसुद्धा काळाची गरज बनली आहे.
अशाप्रकारे रुग्ण दाखल करून घेताना हॉस्पिटल प्रशासन त्याच्या कागदपत्रांची कुठलीही खातरजमा करत नाही काय? असा प्रश्न या घटनेमुळे उपस्थित होतो. ज्या प्रकारे अधिक पैशाकरता हॉस्पिटल प्रशासनामध्ये असले प्रकार चालत असतील तर हा गोरख धंदा ताबडतोब थांबविला पाहिजे.
सामाजिक कार्यकर्ते मनोज शरबिद्रे यांनी तातडीने हा प्रकार उपायुक्त महोदयांच्या कानावर घातला असून असले प्रकार पुन्हा होऊ नयेत याकरता आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन त्यांस लाभले आहे.

कोविड महामारी मध्ये खारघर साठी नियुक्ती करण्यात आलेली डॉक्टर पंकज यांनी या प्रकरणात फार मोलाचे सहकार्य केले. रुग्णाचे कागदोपत्री दाखविलेले नातेवाईक आम्हाला कुठल्याही प्रकारची दाद देत नव्हते. आमच्या सोसायटीमधील हा रुग्ण नसून देखील अन्य रहिवाशांना अनाठायी जाच सहन करावा लागला. एकीकडे कोविड रुग्णांसाठी बेड मिळत नसताना अशाप्रकारे चापलूसी करून मुंबईमधील रुग्ण उपचार घेत असतील तर हा प्रकार फार भयंकर आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.