Press "Enter" to skip to content

सीमा शुल्क विभाग व महसुल गुप्त वार्ता संचलनालयाची संयुक्तरित्या कारवाई

न्हावा शेवा बंदरात एक हजार कोटी रुपयांचे 191 किलो हेरॉईन जप्त

दोघांना अटक : अफगाणिस्तानावरून आले ड्रग्स

सिटी बेल लाइव्ह / जेएनपीटी #

आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सीमा शुल्क विभाग व महसुल गुप्त वार्ता संचलनालयाने (डीआरआय) यांनी संयुक्तरित्या जेएनपीटी बंदरात केलेल्या कारवाईत तब्बल 191 किलो हेरॉईन जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची किंमत एक हजार कोटी रुपये इतकी असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले आहे. अफगाणिस्तानावरून हे ड्रग्स आणण्यात आले होते.

जेएनपीटी बंदरात परदेशातून ड्रग्सचा मोठा साठा येणार असल्याची गुप्त माहिती डीआरआयला मिळाली होती. त्यानुसार डीआरआय व सीमा शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने बंदरात शोध मोहिम राबवून रविवारी संशयीत कंटेनर शोधून काढला.

आयुर्वेदीक मुलेठीच्या नावाखाली त्यातुन हेरॉईन लपवून आणण्यात आले होते. त्याशिवाय काही ड्रग्सचा साठा पाईपमध्येही लवपण्यात आला होता. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

मुलेठीला भारतात मोठी मागणी आहे. त्यामुळे आयुर्वेदीक औषधाच्या नावाने हा ड्रग्सचा साठा भारतात पाठवण्यात आला होता. त्यानुसार शोध मोहिम राबवून हा साठा जप्त करण्यता आला आहे. याप्रकरणी कंटेनरशी संबंधीत दोन व्यक्तींना अटक करण्यात आले आहे. या मागे मोठे रॅकेट असून हा सर्व साठा मुंबई व गोव्यामध्ये जाणार असल्याचा संशय आहे.आंतराष्ट्रीय बाजारात हेरॉईनची किंमत पाच कोटी रुपये किलो आहे. लॉकडाऊनच्या काळात देशात आतापर्यंत पकडण्यात आलेल्या हा सर्वात मोठा अंमली पदार्थांचा साठा आहे. याप्रकरणाचे तार परदेशापर्यंत जात आहेत. रविवारी रात्री उशीरापर्यंत ही कारवाई सुरू होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.