Press "Enter" to skip to content

पोलीस प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी घेतला निर्णय

बेळगाव मधील शिवरायांचा पुतळा आठ दिवसात बसवणार !

सिटी बेल लाइव्ह / बेळगाव #

बेळगाव मधील रातोरात हटवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसात पुन्हा बसवण्याचे आश्वासन कर्नाटक सरकारने दिले आहे.

कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या संतापजनक प्रकारानंतर मनगुत्तीपासून संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद दिसून आले.

कर्नाटक प्रशासनाकडून आठ दिवसात परवानगी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

आठ दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला नाही, तर नवव्या दिवशी गावकरी पुतळा बसवतील, असा निर्णय पोलीस प्रशासन आणि सामाजिक संघटनांनी घेतला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.