Press "Enter" to skip to content

SBI ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

SBI च्या ग्राहकांसाठी पैसे काढण्यासाठी नवीन सुविधा

सिटी बेल लाईव्ह/ नवी दिल्ली.

स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBI ने आपल्या ४२ कोटी ग्राहकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी एक मोठी सुविधा सुरु केली आहे. या नव्या सुविधेमुळे ग्राहकांचे व्यवहार सुरक्षित होतील. आता तुम्ही SBIच्या ATM मध्ये गेल्यावर 10 हजार रुपये किंवा त्याहून जास्त रक्कम काढत असाल, तर ओटीपी विचारण्यात येईल. SBI ने ग्राहकांसाठी ओटीपी आधारित पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पैसे काढताना जो ओटीपी येईल तो तुमच्या बँकेत रजिस्टर्ड असणाऱ्या नंबरवर येईल.

ही सुविधा उपलब्ध करून देण्यामागे काय आहेत कारणे ते थोडक्यात जाणून घेऊया…

डुप्लिकेट कार्डच्या माध्यमातून ग्राहकांना फसवले जाते.

एटीएमच्या माध्यमातून क्लोनिंगचा वापर करत ग्राहकांची माहिती चोरी केली जाते.

गेल्या आर्थिक वर्षात या 18 सरकारी बँकाची जेवढी फसवणूक झाली आहे त्याच्या 30 टक्के रक्कम फक्त एकट्या एसबीआयची आहे.

गेल्या काही महिन्यांपासून एसबीआय आपल्या ग्राहकांना फसवणूक होऊ नये म्हणून नेहमीच सूचना देताना दिसत आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये एखाद्या बँकेने सुविधा सुरू केल्यास अन्य बँका देखील त्याचे तातडीने अनुकरण करतात, त्यामुळे अशाप्रकारे ओटीपी आधारित पैसे काढण्याची सुविधा लवकरच अन्य बॅंका सुद्धा सुरू करतील अशी अपेक्षा आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.