Press "Enter" to skip to content

दिव्यत्वाची येते प्रचिती तेथे कर माझे जुळती !

वडिलांचे छत्र हरपल्यावर महेंद्र घरत यांनी उचलली शैक्षणिक जबाबदारी !

कुवरजित सिंग च्या शैक्षणिक यशात महेंद्र घरत यांचा मोलाचा वाटा !

सिटी बेल लाइव्ह / उलवे / वार्ताहर #

आजपर्यंत विविध सामाजिक कार्यातून कामगार नेते महेंद्र घरत यांची सामाजिक बांधिलकी आपल्याला बघायला मिळाली आहे. पण या माणसात कुठेतरी देवत्व लपले आहे. याची प्रचिती नुकतीच त्यांच्या सहकाऱ्यांना आली.

त्याचे झाले असे, काल शनिवार दिनांक 8 ऑगस्ट 2020 रोजी शेलघर येथील समाज मंदिर हॉल मध्ये ITF/U2U “युनियन बिल्डिंग इन इंडियन हब ” हि कार्यशाळा (प्रशिक्षण )आयोजित करण्यात आली होती.यावेळी या कार्यक्रमा प्रसंगी कुवरजित सिंग या विद्यार्थांचा गौरव करण्यात आला. याचवेळी महेंद्र घरत यांच्या व्यक्तीमत्वाचा एक वेगळा पेहलु सर्वांसमोर उलगडला.

कुवरजीत चे वडील तो चौथीला असतांना वारले. घरात दुसरा कोणी कमावणारे नव्हते. आई आणि एक लहान बहीण असा छोटा परिवार आहे. अशा परस्थिती मध्ये घरातील कर्ता पुरुष निघून गेल्या नंतर त्यांच्या डोक्यावरचं छप्पर निघून गेलं. त्यांच्या आई च्या डोळ्यापुढे अंधार पसरला होता. आता या पुढे आपलं आणि आपल्या मुलांचे कसे होणार ? त्यांच्या शिक्षणाचे काय होणार ? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात येत होते आणि त्याच वेळेस  त्यांच्या नजरे समोर महेंद्र घरत यांची मुर्ती आली.  त्यांनी त्यांची ताबडतोब भेट घेतली.  त्यांनी आपली सर्व व्यथा महेंद्र घरत यांना सांगितली. कुवरजीत सिंग च्या आई ने त्यांना सांगितलं कि मी मुलांना फक्त जेवण देऊ शकेल पण मी शिक्षण देऊ शकत नाही. माझ्या मुलांना खुप शिकायची ईच्छा आहे परंतु माझी मुलांना शिकवण्याची परस्थिती नाही. आपण आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली. महेंद्र घरत यांनी ही विनंती क्षणाचाही विलंब न लावता मान्य केली.  ते म्हणाले,  "तुमच्या दोन्ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी हि मी घेत आहे. त्यांना जो पर्यंत शिक्षण घ्यायचे आहे तो पर्यंत मी त्यांना मोफत शिक्षण देईन."

त्याचाच प्रत्यय म्हणून नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी चा निकाल या मध्ये कुवरजीत सिंग या विद्यार्थ्याने 83% गुण प्राप्त केले आहेत.या यशा बद्दल कुवरजीत सिंग याचा कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी त्याची आई व बहीण उपस्थित होती. केवळ कुवरजित नाही तर समाजतील असंख्य गरीब गरजु कष्टकऱ्यांच्या मुलांना ते मोफत शिक्षण देत आहेत. त्यांनी यमुना शैक्षणिक सामाजिक संस्थे मार्फत कमीत कमी खर्चात मुलांना चांगला दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून गव्हाण येथे शाळा काढली. शेकडो मुले या शाळेत आज चांगल्या उच्चप्रतीचे ते शिक्षण घेत आहेत.

या सत्कार सोहळ्या च्या वेळीस कुवरजीत सिंगच्या आई ने महेंद्र घरत यांचे आभार मानले. त्या म्हणाल्या, "साहेबांचे हे ऋण आम्ही कधीच विसरू शकत नाही आज कुवरजीत ला हे यश प्राप्त झाले आहे ते फक्त आणि फक्त साहेबांमुळेचं शक्य झाले आहे. त्याचे अनंत उपकार आमच्या परिवारावर आहेत. ते आमच्या पाठीशी उभे आहेत हेच आमच्या साठी खुप आहे."

या वेळी या कार्यशाळेत आपल्या NMGKS संघटनेचे अध्यक्ष कामगार नेते महेंद्र घरत, कार्याध्यक्ष पी. के. रमण, सरचिटणीस वैभव पाटील व संघटनेचे 30 प्रतिनिधी उपस्थित होते. ITF दिल्ली ऑफिस वरून राजेंद्र गिरी, संगम त्रिपाठी व अरविंद कौशल, ITF लंडन वरून इंगो मोरोस्की हे उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.