Press "Enter" to skip to content

कोविड सेंटर असलेल्या हॉटेलला भीषण आग

आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथील घटना

कोरोना पासून बचाव करण्यासाठी आले, अन् आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

आत्तापर्यंत सात दुर्दैवी रुग्णांचा मृत्यू

सिटी बेल Exclusive/ विजय वाडा.

आंध्र प्रदेशमधील विजयवाडा येथे कोविड सेंटर असलेल्या एका हॉटेलला भीषण आग लागली असून यात सात रुग्णांचा गुदमरुन मृत्यू झाला आहे, तर ३० जणांना वाचवण्यात यश आले आहे. आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. आज (रविवार) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. एएनआयने याबाबत अधिकृत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

स्वर्ण पॅलेस हॉटेल या रुपांतरीत कोविड केअर सेंटरमध्ये ३० रुग्ण आणि १० वैद्यकीय कर्चचारी होते. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करीत आहेत.पण हॉटेलमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर धूर पसरला असून त्यामुळे इथल्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. दरम्यान, १७ रुग्णांना लॅडरच्या माध्यमातून सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. तर इथल्या सुरक्षा रक्षकासह दोन कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरुन उड्या टाकल्या आहेत. एनडीआरएफच्या कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.कृष्णा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद इम्तियाज यांनी सांगितले की, “पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली. प्राथमिक चौकशीतून शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचे कळते. मात्र, याचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या आग लागलेले हॉटेल पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. सुमारे २२ रुग्ण या ठिकाणी उपचार घेत होते.”

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.