Press "Enter" to skip to content

वरिष्ठांनी दिलेल्या संधीचे सोने करून दाखवीन

भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश चे नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

# वाचा आणि पहा ही विशेष मुलाखत फक्त सिटी बेल लाइव्ह वर

भाग 1
भाग 2
भाग 3

सिटी बेल लाईव्ह/ exclusive

भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर,नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली. अत्यंत महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाल्यानंतर आमच्या प्रतिनिधीने विक्रांत पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा केली असता वरिष्ठांनी दिलेल्या संधीचे सोने करून दाखवीन, आणि जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखविला आहे त्याला कधीही तडा जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी बोलताना विक्रांत पाटील म्हणाले की भारतीय जनता पार्टीमध्ये वेगवेगळ्या आघड्या आहेत निरनिराळे सेल आहेत, यामधील युवा आघाडी ही सातत्याने भारतीय जनता पार्टीचे शक्तिस्थान राहिले आहे. पक्षामध्ये नेहमीच युवाशक्तीला प्रोत्साहित करण्याचे काम सातत्याने होत असते. म्हणूनच या पदावर माझी नियुक्ती होणे हा मी माझा सन्मान समजतो. युवा मोर्चाच्या माध्यमातून युवक-युवती, विद्यार्थी यांचे प्रश्न सोडविण्याची संधी पक्षाने मला दिली आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी पक्षनेतृत्वाचे आभार मानतो. पक्ष वरिष्ठांनी स्थानिक पातळी ते प्रदेश पातळीपर्यंत मला नेहमीच निरनिराळ्या संधी देऊन प्रोत्साहित केले आहे. युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष पद ही फार मोठी जबाबदारी आहे. मी तर म्हणेन की कामाची व्याप्ती पाहता तो एक काटेरी मुकुट सुद्धा आहे. कारण माझ्याकडून आता अनेक पातळ्यांवर अपेक्षा वाढल्या आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या माझ्याकडून कडून अपेक्षा आहेत. संघटनेच्या माझ्या कडून अपेक्षा वाढल्या आहेत. युवकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. आणि युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या देखील माझ्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत.महाराष्ट्राच्या सध्याच्या सरकारने युवक-युवती आणि विद्यार्थी यांच्या बाबत उदासीन भूमिका घेतलेली आहे त्यामुळे विवंचनेत असणाऱ्या युवा वर्गाच्या माझ्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. वरिष्ठ नेते यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला मी कदापिही तडा जाऊन देणार नाही. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, संघटनमंत्री विजयजी यांच्यासह तमाम वरिष्ठ नेते मंडळी, राज्यभरातील तमाम युवा मोर्चाचे कार्यकर्ते ज्यांनी प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अथक परिश्रम घेतले आहेत या साऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन युवक-युवती विद्यार्थी यांचे प्रश्न सोडवण्याची ही मोठी संधी मला मिळालेली आहे आणि या संधीचे मी निश्चितच सोने करीन. भाजपाच्या युवा मोर्चामध्ये यापूर्वी केलेल्या कामाचा अनुभव मला निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. प्रदेश अध्यक्ष संभाजी पाटील निलंगेकर जे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री होते त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात मध्ये सचिव म्हणून काम करण्याचा मला तीन वर्षांचा अनुभव आहे. पंकजाताई मुंढे यांनी ग्रामविकास मंत्री म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला.त्या प्रदेशाध्यक्ष असतानाच्या कार्यकाळात मी महाराष्ट्र राज्याचा सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे, त्यानंतर योगेश केळकर हे युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष असतानाच्या कार्यकाळात देखील मी सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्या ज्या ज्येष्ठ मंडळींची साथ मला लाभली त्यांची कार्यपद्धती मी अतिशय जवळून पाहिली आहे, त्यांच्या काम करण्याची खुबी मी आत्मसात करण्याचा प्रयत्न केला आहे. या सार्‍याचा मला निश्चितच फायदा होईल. महाराष्ट्रातील युवा वर्गाच्या समस्यांचे निराकारण करत त्यांना उत्कर्ष साधण्याकरता सहकार्य करणे हेच आमच्या समोरील ध्येय असेल.

युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्या नंतर संघटना मजबुतीकरण याला प्राधान्य देणार असल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले. कोरोनाविषाणू च्या महामारी च्या पार्श्वभूमीवर पदवी, पदव्युत्तर व अन्य महत्त्वाच्या परीक्षांच्या न होण्याने युवावर्ग हवालदिल झाला असल्याकारणाने त्या प्रश्नाला देखील प्राथमिकता असेल असे ते म्हणाले. नुकत्याच येऊन गेलेल्या चक्रीवादळा च्या तडाख्या मुळे सीमावर्ती भागातील नुकसान झालेल्या ज्या बांधवांपर्यंत अद्याप मदत पोहोचली नाही त्यांचे प्रश्न देखील प्राधान्यक्रमाने हातामध्ये घेऊ असे विक्रांत पाटील म्हणाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.