Press "Enter" to skip to content

बँकेच्या भूमिकेत बदल न झाल्यास तिव्र आंदोलन करु – भाई मोहन गुंड

बीड जिल्ह्यात पीक कर्जासाठी बँकेच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाभर अन्नत्याग आंदोलन

सिटी बेल लाइव्ह / बीड / प्रतिनिधी #

बीड जिल्ह्यामध्ये पिक कर्ज संदर्भात आवश्यक कागदपत्र च्या नावाखाली शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक व आर्थिक पिळवणूक केली जात आहे. बँकांनी सहजा सहजी शेतकऱ्यांना मदत व्हावी व चालु असलेल्या कोरोनाच्या महामारीत शेतकऱ्याची होणारी अडवणूक थांबावी यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने येथील केज माजलगाव बीड आंबेजोगाई यासह प्रत्येक गावात शेतकऱ्यांनी बांधावर बसून.एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

या संदर्भात जिल्हाभर भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 10 वाजल्या पासून 4 वाजेपर्यंत अन्नत्याग आंदोलन करून मुजोर बँकांचा निषेध केला करण्यात आला.

तालुकास्तरावर दिलेल्या निवेदनात, शेतकऱ्यांची कसल्याही प्रकारची अडवणूक न करता तात्काळ पीक कर्ज वाटप करावे, मागील वर्षी ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होऊनही कर्जमाफी मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी देऊन दुसरे कर्ज वाटप करावे, बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सोसायटी मार्फत शेतकऱ्यांना कर्ज तात्काळ विना अट वाटप सुरू करावी, दुबार पेरणीची वेळ आलेल्या व फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना बि- बीयाणे कंपनीकडून शेतकऱ्यांना 50 हजार रुपये हेक्टरी भरपाई देण्यात यावी, वयोवृद्ध शेतकऱ्यांना देखील पीक कर्ज वाटप करावे, कुटुंबातील एकत्र क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना देखील कर्ज बँकांनी द्यावे, वीज वितरण कंपनीने लॉकडाउन काळातील चार महिन्याचे वीज बिल माफ करून वाढीव वीज बिल दुरुस्त करून द्यावेत. या मागणी साठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालया समोर एक दिवसाचे आन्नत्याग आंदोलन करण्यात आले.

यानंतरही शेतकऱ्यांची बँके कडून होणारी पिळवणूक थांबली नाही तर संबंधित बँकेला टाळे ठोकण्यात येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या आंदोलनात शेतकरी कामगार पक्षाचे राज्य मध्यवर्ती समिती सदस्य भाई मोहन गुंड अॅड नारायण गोले अॅड संग्राम तुपे सौरव संगेवार अशोक रोडे दत्ता प्रभाळे लखन सोळुंके भीमराव कुठे मंगेश देशमुख वजीर शेख बाबाराजे गायकवाड प्रवीण गवते राज तपसे यासह शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते यांनी सहभाग मोठ्या प्रमाणावर घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.