Press "Enter" to skip to content

कोळी समाजाच्या आंदोलनाचा रुद्र निसर्गाशी सामना

पोलिसांच्या शिष्टाईमुळे सुवर्णमध्य निघाला…!

सिटी बेल लाइव्ह / मुरूड / समीर बामुगडे #

कोकणातील मासळी विक्री सध्या कोरोना आणि लोकडाउनच्या काळात खुप अडचणीत आहे. मुरुड तालुक्यातील आगरदांडा समुद्रकिनाऱ्यावरील तिन पैकी एक जेट्टी तात्पुरत्या स्वरूपात मिळावी अशी मागणी मच्छीमार म्हणून कोळी समाजाने केली.परंतु मेरीटाईम बोर्ड असो किंवा संबंधीत कोणत्याही विभागाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे सकाळ पासुन समुद्राच्या रौद्र वादळात होडी नांगरणीसाठी शेकडो बोट मालक संतप्त झाले होते.त्यांच्या उद्रेकातून काही अवचीत घडु नये म्हणून मुरुड पोलिसांनी केलेल्या शिष्टाईने संभाव्य आंदोलनात्मक परिस्थिती नियंत्रणात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राजपुरी-आगरदांडा खाडीत मुरुड,एकदरा,राजपुरी,दिघी,तुरुंबाडी,खामदे अशा अनेक गावांच्या स्थानिक व मुंबईतील मच्छीमार बोटिंची भयानक अडचण झाली.आगरदांडा किनाऱ्यावर तिन जेट्टी आहेत त्यामुळे बंदर आणि मेरी बोर्ड आदी प्रशासनांकडे माजी नगरसेवक तसेच कोळी समाजातील सक्रिय युवा नेतृत्व प्रकाश सरपाटील यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन बोटी नांगरायला आणि मासळी उतरवायची रीतसर परवानगी मागितली.पण प्रवासी जेट्टी आहेत या सबबीखाली त्यांना तिन पैकी कोणतीही जेट्टीसाठी परवानगी मिळाली नाही.

मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भावाने त्यांना त्यांच्याच परिसरातील गावात यावे लागले आहे.पण त्यांच्या मासळीची किंवा बोटी मधील लोकांच्या धोकादायक स्थितीतील गोष्टींचा विचार कुठूनही कोण करत नव्हता.त्यामुळे दोन-तीन दिवसांत मच्छीमार लोकांचा हा संताप टिपेला पोहोचला होता. मुरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगराव पवार यांनी घटनेचे गांभीर्य बखुबी ओळखले.

वादळी भयंकर वातावरणात त्यांनी आगरदांडा किनाऱ्यावर सागरी सुरक्षा चौकीत सोशल डिस्टंनसींगचे पुर्णत: भान राखुन संतप्त कोळी समाज तसेच सोसायटी प्रतिनिधीना मेरी टाईम बोर्ड,बंदर विभाग तसेच प्रवासी वाहतूक संस्था प्रतिनिधी यांच्यात उत्तम संवाद घडवुन आणला.प्रवासी असो किंवा मच्छीमार नागरिक सर्वांचे जीवन महत्त्वाचे आहे हे त्यांनी खुप संय्यमाने सर्वांना समजावले.

सर्व संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ माहिती दिली त्यानंतर जेट्टीच्या समोरच्या बाजूला जंगल जेट्टीसाठी कोणत्याही प्रकारे अडचण येणार नाही अशी अट घालून आजूबाजूच्या परिसरात मच्छीमार बोटीना नांगरणीसाठी जागा मिळवुन दिली. कोळी समाजातील उद्रेकातून यापूर्वी अनेक संघर्ष मुरुडच्या मातीत घडले आहेत.फारपूर्वी अगदी जिल्हाधिकारी यांच्या गाडीवर देखील दगडफेक होण्या इतपत वातावरण चिघळले आहेत.परंतु समन्वयाच्या संवादाने मुरुड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पवार यांनी फार दक्षपणे संभाव्य तंटा नियंत्रीत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

मुरुड आगरदांडा येथिल वापरात नसलेली जेटी मच्छि व्यवसायाकरिता मिळावी म्हणून मुरुड तालुका नाखवा संघाचे अध्यक्ष प्रकाश सरपाटील, उपअध्यक्ष बाळोजी शेगजी, उपअध्यक्ष धृवा लोदी,श्रीवर्धन दिधी सोसायटीचे चेअरमन लक्षमण मेंदाडकर .जनार्दन गोवारी, मुरूड जंजिरा जयभवानी माच्छि.सोसायटी चेअरमन महेंद्र गार्डी, मुरुड सागरकन्या मच्छि.सोसायटीचे चेअरमन मनोहर बैले , मुरूड राजपुरी महालक्ष्मी सोसायटीचे चेअरमन विजय गिदी, मुरूड एकदरा हनुमान मच्छि.सोसायटी चेअरमन पाडुरंग आगरकर , महाहेश्वरी मच्छि. सोसायटीचे चेअरमन जगन वाधरे प्रयत्नशील आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.