Press "Enter" to skip to content

जबरदस्त वादळाचा जे एन पी टी ला तडाखा !

जेएनपीटीच्या ३ क्रेन मोडून करोडोचा आर्थिक नुकसान


सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)

आज झालेल्या वादळी पावसामुळे जेएनपीटी बंदराच्या काही वर्षांपूर्वी आणलेल्या ३ क्रेनचे पूर्णपणे लॉसमध्ये तर आणखीन १ क्रेन डॅमेज झाली असल्याने कंपनीचे करोडोचे नुकसान झाले मात्र कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती कामगार वर्गांनी दिली आहे.
गेले दोन दिवसांपासून पावसाने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केले आहे. आज तर सकाळपासून वादळीवारा पावसाने आज थैमान घातले आहे. दुपारी ४ च्या सुमारास जेएनपीटी बंदराच्या ६,७, व ८ नंबरच्या ३ क्रेन पूर्णपणे मोडून पडल्या आहेत. तर ९ नंबरच्या क्रेन डॅमेज झाली आहे. यामुळे कंपनीचे करोडोचे नुकसान झाले असल्याची माहिती कामगार प्रतिनिधीनी दिली.
पडणाऱ्या वादळी पावसामुळे सदर कामकाज पूर्णपणे बंद होते. परंतु क्रेन बाबत जी खबरदारी घ्यावयाची होती. ती प्रशासनाने न घेतल्याने क्रेनचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. एकतर काम कमी होते त्यात आता क्रेन मोडल्याने कामकाज पूर्णपणे ठप्प होणार आहे. मात्र या क्रेन अपघातांची चौकशी करण्याची मागणी कामगार वर्गाकडून जोर धरू लागली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.