Press "Enter" to skip to content

श्री सदस्यांचे वीज पुरवठा सुरळीत व रस्ते मोकळे करण्यासाठी मोठे योगदान

समाजदूत पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आमदार महेंद्र दळवी यांच्या वतीने विशेष सत्कार

सिटी बेल लाइव्ह / अलिबाग (प्रतिनिधी)

  चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात अलिबाग मुरुड तसेच रोहा या विभागात नुकसान झाले होते त्या कठीण प्रसंगात पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदशना खाली श्री सदस्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी व रस्ते मोकळे करण्यासाठी केलेल्या सेवेबात आमदार महेंद्र दळवी  यांनी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.  

समाज घडवण्याचे तसेच समाजमनातील डळमळीत झालेला आत्मविश्वास पुन्हा नव्याने जागृत करण्याचे महान कार्य आदरणीय धर्माधिकारी कुटुंब अव्याहतपणे करत असताना त्यांच्या महान कार्याची पोचपावती सर्वदूर पसरली आहे. मग विविध ठिकाणी समर्थ बैठक असो, रक्तदान शिबिर असो, कोल्हापूर ,सांगली येथील पूर असो, देशव्यापी स्वच्छता अभियान असो किंवा अलिबाग तालुक्यातील निसर्ग चक्रीवादळ  मानवतेवर आलेले कोणताही संकट असो आशा विविध प्रसंगात डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा पद्मश्री डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिनदादा धर्माधिकारी हे समाजच्या उद्धारासाठी सतत खंबीरपणे उभे असतात.

देशावरचे संकट असो वा काहीही धर्माधिकारी कुटुंब त्यात निस्वार्थी पणे झोकून समाजासाठी कार्य करत असतात व अनेकांना या कार्याची प्रेरणा देखील मौखिक निरुपणातून देत असतात.
महाराष्ट्रात दिनांक 3 जून रोजी झालेल्या चक्रीवादळामूळे अतोनात नुकसान झाले राज्यात विविध ठिकाणी चक्रीवादळ  नैसर्गिक संकटामुळे घरांचे, वाड्यांचे, शेतकऱ्यांचे शासनाचे अतोनात नुकसान झालेले दिसले. अनेक ठिकाणी विद्युत पोल पडल्यामुळे समग्र अलिबाग मुरुड तालुका अंधाराच्या छायेत गेला, रस्ते ठप्प झाले आशा वेळी शासनाची मदत अपुरी पडत असताना चक्रीवादळाने झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी विद्युत पोल बसवणे अनेक ठिकाणी झालेले नारळ,सुपारी, आंब्यांच्या बागांची स्वच्छता अशा कार्यासाठी मनुष्यबळ कमी पडत असताना आदरणीय आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वतीने अलिबाग मुरुड परिसरात पडलेले विद्युत पोल बसवण्यासाठी सहकार्य करण्यात आले. 

या महान कार्याबद्दल शिवसेनेचे अलिबाग मुरुड विधानसभेचे आमदार महेंद्र दळवी यांचे वतीने डाॅ. आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन दादा धर्माधिकारी यांना मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
सध्याचा कोरोना च्या काळात अनेक ठिकाणी राबवलेली रक्तदान शिबिरे, परिसराची स्वच्छता, तसेच अनेक काळापासून राबवले विविध शालेय उपक्रम, अनेक अपंगांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप व असे शासनाला सहकार्य करणारे कार्य नेहमीच डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात येतात. त्याच बरोबर अनेक कुटुंबाना आधार देऊन त्यांचा डळमळीत झालेला आत्मविश्वास पुनः जागृत करण्याचे कार्य हे कित्येक काळापासून श्री समर्थ बैठकीच्या मौखिक निरुपणातून अध्यात्माचा मार्ग दाखवून बरोबरीनेच देशासाठी आणि समाजसाठी निस्वार्थी पणे झटून देशावरील समाजावरील ऋण कोणत्यातरी माध्यमातून फेडण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करावे अशी समाज जागृतीचे कार्य डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली जगाच्या कानाकोपऱ्यात होत आहे.
शासनाच्या मदतीस तसेच समाजवर आलेल्या संकटात सदैव खंबीरपणे उभे राहून सर्वतोपरी मदत करण्याच्या भूमिकेतून दिनांक ३ जून रोजी झालेल्या चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात अलिबाग मुरुड तसेच रोहा या विभागात नुकसान झाले होते त्या कठीण प्रसंगात
आदरणीय पद्मश्री डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदशना खाली श्री सदस्यांनी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी व रस्ते मोकळे करण्यासाठी केलेल्या सेवेबात आमदार महेंद्र दळवी  यांनी पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना शाल श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तालुक्यासह राज्याच्या किनारपट्टी झालेल्या चक्री वादळात झालेल्या नुकसनीतून जमेल तेवढी मदत करून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी जे सहकार्य केले त्याबद्दल आमदार महेंद्र दळवी, शिवसेना नेते विजू कवळे,शिवसेना माजी तालुका प्रमुख दीपक रानावडे यांनी आप्पासाहेबांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा यथोचित सन्मान केल्याने समस्थ श्री बैठक परिवार व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.