Press "Enter" to skip to content

वल्गन आली… बाजारात गर्दी झाली


वल्गनीचे मासे खाण्यासाठी खवय्यांची झुंबड


सिटी बेल लाइव्ह / स्पेशल रिपोर्ट #


गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वलगणीचे मासे पाती(शिवडा),चिमणे, मल्याचे मासे, कानोसे, आरोल मासा, करवाली, गोडीवाव, चिचे(फोरसिंगे), कोळंबी आदी मासळी नदी पात्रात तसेच गावागावात शेतकऱ्यांच्या शेतातही दाखल झाली आहे.त्यामुळे पावसाचा आनंद व नदीपात्राजवळच्या शेतात आलेले मासे पकडण्यासाठी आणि वर्षातून एकदाच वलगणीचे मासे खाण्याचा स्वाद मिळत असल्याने ते विकत घेण्यासाठी खवय्ये मासळी बाजारात गर्दी करत आहेत. नदी, खाडी किनाऱ्यालगत असलेल्या गावातील मासेमारी करणारे व मत्स्यप्रेमी रात्री शेतातल्या पाण्यात भुसे (जाळे) अथवा डोल लावतात. पावसाच्या सुरुवातीला माश्यांच्या प्रजननाचा हंगाम असल्याने शेतातल्या पाण्यात मासे आपली अंडी सोडायला येत असतात. तेव्हा ते सहजपणे मत्स्य प्रेमींच्या जाळ्यात सापडत असतात. पाणी ओसरते तेव्हा जाळ्यात भरपूर मासे सापडतात. मात्र वर्षातून केवळ एकच वेळ म्हणजे सुरुवातीच्या पावसातच वलगण सापडते. त्यानंतर वलगण दुर्मीळ होते.

वलगणीचे मासे चवदार असल्याने खवय्ये मोठी किंमत मोजूनही त्याची खरेदी करतात. पाती, गोडीवाम,मल्याचे मासे,करवाली ,चिमणी हे मासे वलगणीत मोठ्या प्रमाणात आढळतात. या वलगणीच्या माश्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने त्यांचे प्रति किलो दर पाती 400 रुपये,मळे,चिचे 500 रुपये,करवाली 200 रुपये, चिमणी 600 रुपये, कोळंबी 400 रुपये दराने विकली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.