Press "Enter" to skip to content

दिलासादायक बातमी : ६० ते ८० वयाचे ज्येष्ठ नागरिक ठणठणीत बरे

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमधून १३० ज्येष्ठ नागरिकांनी केली कोरोनावर मात…

सिटी बेल लाइव्ह / नवी मुंबई / उमेश भोगले #

जेष्ठ नागरिकांमध्ये कोरोनाविषयी भीतीचे प्रमाण सर्वाधिक असून या रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मूत्रपिंडाची आजार, मधुमेह व इतर गुंतागुंतीचे आजार असल्यामुळे अनेक जेष्ठ नागरिक उपचारासाठी घराबाहेर पडत नाहीत. यामुळे अनेकांमध्ये कोरोना आजाराची लक्षणे आढळून आली तरीही त्यावर योग्य उपचार होत नाही. म्हणुनच ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहेत. परंतु नवी मुंबईतील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरमधून एक दिलासादायक बातमी येत असून आजपर्यंत १३० ज्येष्ठ नागरिक ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. यामध्ये ६० ते ८० वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाउनमुळे अनेक जेष्ठ नागरिक घरातच अडकलेले असल्यामुळे मॉर्निंग वॉक, कट्ट्यावरील गप्पा, धार्मिक पर्यटन अशा अनेक गोष्टीवर बंधने आली आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांची चिडचिड होत आहेत असे आमच्या निदर्शनास आले आहे अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली.

आमच्या इथे आलेल्या कोरोना पॉजीटीव्ह जेष्ठ नागरिकांना आम्ही कोरोनासोबतच मानसिक आधार देण्याचे काम करीत होतो. बेडवरूनच त्यानां आम्ही व्यायामाचे प्रकार, योगसाधना शिकवली जाते त्यामुळे मानसिक ताणतणाव दूर होण्यास मदत होत आहे. आयुष्याची संध्याकाळ अनुभवणाऱ्या या ज्येष्ठ नागरिकांनी कोरोनाचा फार मोठा धसका घेतला आहे. कारण या वयामध्ये शारीरिक व्याधी उध्दभवलेल्या असतात तसेच अनेक नागरिकांना आर्थीक समस्यांचा सामना करावा लागत असतो. अशातच कोरोना झाला तर आपले काही खरे नाही ही भावना जेष्ठ नागरिकांमध्ये वाढलेली दिसून येते.

त्यामुळे आमच्याकडे आलेल्या जेष्ठ नागरिकांचे आम्ही मानसिक समुपदेशन करीत आहोत. अशी माहिती तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कोरोना कक्षातील डॉक्टरांच्या टीमने दिली. जेष्ठ नागरिकांनी कोरोना रिपोर्ट पॉजीटीव्ह आला तरी कोणतेही मानसिक दडपण न घेता आवश्यक ती खबरदारी घेऊन डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे असे आवाहन तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे करण्यात आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.