Press "Enter" to skip to content

मिना मनोज पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास

अंगणवाडी मदतनीस महिला अनेक संकटे झेलत जिद्द व अथक परिश्रमाच्या जोरावर वयाच्या ४२ व्या वर्षी झाली इयत्ता १० उत्तीर्ण

सिटी बेल लाइव्ह / राजेश बाष्टे / अलिबाग #

अलिबाग तालुक्यातील ' कातळपाडा ' ह्या छोट्या खेडेगावातील " गं.भा. मिना मनोज पाटील "* ह्या महिलेने कालच लागलेल्या इयत्ता दहावी च्या निकालात ५८% गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे.

खरंतर हे यश मिळवणे तितके सोपे होते असे नाही. कारण एैन तारुण्यात त्यांच्या पतीचं निधन झालं. या अचानक आलेल्या संकटामुळे आपल्या 3 आपत्यांसह संसाराची सर्व जबाबदारी ही पुर्णतः स्वत: वर आली. त्यात कुठेही कसुर न करता जिद्द व अविरत कष्टाने संसाराचा गाडा चालवत पदरी असलेल्या दोन मोठ्या मुलींना शिक्षण पुर्ण करुन विवाह देखील लावून दिली. आत्ता त्यांचा मुलगा ITI येथे द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. खरचं कौतुक आहे .

कातळपाडा येथील मीना मनोज पाटील या जिद्दी महिलेने ईयत्ता १० मध्ये ५८% गुण मिळवुन उत्तीर्ण होऊन जिद्द व अथक परिश्रमाच्या जोरावर यशस्वी होऊन समाजात एक नविन आदर्श ठेवला.
मिना मनोज पाटील या कातळपाडा येथील अंगणवाडीवर मदतनीस म्हणून काम करीत आहेत. सोबतच शेतावर मोलमजुरी करून संसाराचा गाडा एकटीने चालवत कमालीचे परीश्रम घेत आहेत. स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर आपले अपुरे राहिलेले शिक्षणाचे स्वप्न त्यांनी आज पुर्ण केले.

या जिद्दी महिलेचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्णान सेना अलिबाग यांच्या वतीने अलिबाग पंचायत समिती , माजी सदस्य सौ. लक्ष्मीबाई विष्णु पाटील यांच्या उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या सचिव सौ. अश्विनी कंटक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपजिल्हाध्यक्ष प्रणय पाटील , तालुका अध्यक्ष रोशन पाटील हे उपस्थित होते.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालूका अध्यक्ष देवव्रत विष्णु पाटील , तालुका उपाध्यक्ष अनिल कंटक यांनी मिना पाटील यांच यावेळी एक आईच्या जिद्दीला मनसे सलाम करत कौतुक केलं तसेच उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या . मिना पाटील यांच्या या यशाची माहिती जिल्हा परीषद , रायगडच्या महिला कल्याण व बालविकास विभागाचे सि ओ मंडलिक यांना समजली असता त्यांनी फोनवरून मिना पाटील यांचं कौतुक केलं .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.