Press "Enter" to skip to content

९ ऑगस्ट ला महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा चालक करणार आमरण उपोषण

ऑटोरिक्षा टॅक्सी क्रांती संयुक्त कृति समिती , महाराष्ट्र्र राज्यच्या प्रमुख प्रतिनिधींच्या बैठकीत झाला निर्णय

सिटी बेल लाइव्ह / मुंबई #

ऑटोरिक्षा टॅक्सी क्रांती संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य च्या प्रमुख प्रतिनिधींची0 व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्वानुमते पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे

गेल्या चार महिन्यांपासून महाराष्ट्रातील ऑटोरिक्षाचालक-मालक हे त्यांचा व्यवसाय बंद असल्यामुळे तथा कोणत्याही उत्पन्नाचे साधन उपलब्ध नसल्यामुळे मेटाकुटीस आले आहेत. अशा परिस्थितीत या ऑटोरिक्षा चालकांना महाराष्ट्र शासनाने तातडीने आर्थिक मदत देऊ करावी, अशा प्रकारची निवेदने क्रांती कृती समितीच्या माध्यमातून शासनास देण्यात आली आहेत. परंतु, शासनाने ही बाब गांभीर्याने घेतलेली नाही. ह्याबाबत तमाम ऑटोरिक्षा चालक मालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याच कालावधीमध्ये महाराष्ट्रातील आठ ऑटोरिक्षा चालकांनी आत्महत्या केली आहे. कित्येक ऑटोरिक्षाचालक हे नैराश्येमध्ये जगत आहेत. अशा परिस्थितीत ऑटो रिक्षा चालकांना वाचविण्यासाठी ठोस भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. त्याकरीता आज सायंकाळी आठ वाजता झालेल्या ह्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सर्वांनमते निर्णय घेण्यात आलेला आहे की, दिनांक ०९ऑगस्ट २०२० रोजी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करून आंदोलन करावे.

महाराष्ट्रातील तमाम चालक मालक त्यांच्या सर्व संघटनांना निवेदन करण्यात येते की, आपण सदरचा संदेश आपल्या विभागांमधील सर्व ऑटोरिक्षा चालक -मालकांपर्यंत पोहोचविणे आणि दिनांक ०९ ऑगस्ट २०२० रोजी संपूर्ण देशामध्ये “क्रांती दिन” म्हणून साजरा केला जातो तो आपण “ऑटोरिक्षा क्रांती दिन”म्हणून साजरा करणार आहोत. त्या निमित्ताने हे आमरण उपोषण आंदोलन आपण करणार आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यावी, सर्वांनी ह्या आंदोलनात सहभागी व्हावे ही विनंती, धन्यवाद!

ऑटोरिक्षा चालकांचा प्रमुख मागण्या :

१. प्रत्येक ऑटोरिक्षा चालकास लॉकडाऊन कालावधीतील प्रत्येक महिन्याकाठी रु. ५०००/- ची आर्थिक मदत शासनाने द्यावी.

२.आत्महत्याग्रस्त ऑटोरिकहचालकांच्या प्रत्येक कुटुंबास रु. १०,०००/- ची मदत ताबडतोब शासनाने द्यावी.

३. ऑटोरिक्षाचालकांना कर्जमाफी मिळावी.

४.ऑटोरिक्षा चालकांना कोविड योद्धा म्हणून घोषित करून त्यांना रु.५० लाखांचे विमा कवच जाहीर करावे.

५. घोषित केलेल्या कल्याणकारी मंडळाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी.

आपले ,
कासम मुलाणी- नवी मुंबई
9892191925

श्रीकांत आचार्य- पुणे 9822500511

त्रिंबक स्वामी – लातूर 9225469999

डी. एम. गोसावी – मुंबई 9082787803

सौ. अश्विनी मोरे – ठाणे 9933598612

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.