Press "Enter" to skip to content

ब्रेकिंग न्यूज : WHO चे घुमजाव

काय तर म्हणे लक्षणे नसलेले कोरोना पसरवत नाहीत

म्हणजे लॉक डाऊन फुकट गेले की हो !

पहा हा व्हिडिओ

सिटी बेल लाईव्ह/ exclusive

Corona म्हणजे अजिब रसायन ठरत चालले आहे. एकीकडे प्रसारमाध्यमे तो रौद्र रूप धारण करत असल्याच्या बातम्या रंगवत आहेत, दुसरीकडे जो-तो औषध सापडल्याचे दावे करत सुटला आहे, कोणाला पुढच्या दीड महिन्यात लस बनवून पाहिजे आहे, तर काही मंडळींनी पुन्हा लॉक डाऊन लोकांच्या माथी मारून अर्थ चक्राला खीळ घातली आहे. हा एवढा सावळागोंधळ कमी होता की काय म्हणून मुख्यमंत्र्यांनी आठ तारखेपासून हॉटेल्स आणि लॉज सुरू करण्याचे संकेत दिलेत.मुळात फारसा भयावह नसलेल्या या विषाणूचा प्रादुर्भाव या बाबत कुणालाही काहीही माहित नाही.
कोरोना विषाणू च्या संक्रमणा बाबत समोर येणारे आकडे पाहता संक्रमण जरी वाढत असलं तरी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील तितकेच जास्त आहे. सहा महिन्याच्या बाळापासून ते एकशे चार वर्षाच्या वृद्धांपर्यंत लोकांनी कोरोना विषाणूची लागण होऊन देखील बरे होऊन दाखवले आहे. सकारात्मक पार्श्वभूमी तयार होत असतानाच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने एक गुगली टाकला आहे… या संस्थेच्या covid-19 टेक्निकल लीड डॉक्टर मारिया वेनं करकोव यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार लक्षणे नसलेल्या covid-19 पॉझिटिव पेशंट कडून संक्रमण पसरवले जात नाही. अमेरिकेच्या सेंट फ्रान्सिस हॉस्पिटलच्या संचालक परी विराजमान असणारे डॉक्टर डेव्हिड समदी यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा दावा योग्य असल्याचे म्हटले जात आहे. डॉक्टर डेव्हिड यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ने पूर्णपणे यूटर्न घेत who संस्थेने आपलेच म्हणणे फिरवले असल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार लक्षणे नसणारे covid-19 पॉझिटिव पेशंट हे वाहक असतात असे समजून सोशल डिस्टन्स आणि लॉक डाऊन या संकल्पनांनी जन्म घेतला होता. आणि आता जर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आपला दावा फिरवत असेल तर सगळेच मुसळ केरात गेले असे डॉक्टर डेव्हिड यांचे म्हणणे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.