Press "Enter" to skip to content

निबंध,चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा

सुयश क्लासेस आवरे व निगा फाऊंडेशनच्यावतीने ऑनलाईन निबंध , चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा

सिटी बेल | आवरे | निवास गावंड |

सुयश क्लासेस आवरे व निगा फाऊंडेशनच्या वतीने स्पर्धकांच्या सुप्तगुणांना चालना देण्यासाठी दरवर्षी प्रमाणे सर्व वयोगटासाठी खुली ऑनलाईन निबंध,चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. निबंध स्पर्धा विषय कोरोना एक जागतिक महामारी व सुरक्षित उपाय, चित्रकला स्पर्धा विषय-जलसंवर्धन ही काळाची गरज व वक्तृत्व स्पर्धा विषय वने,वन्यजीव व त्यांचे संरक्षण ही एक जबाबदारी,असे विषय ठेवण्यात आले आहेत.

स्पर्धेत सहभागी होण्याचा कालावधी २४ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२१ राहील. तसेच सायं. ०२ नोव्हेंबर २०२१ रोजी बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात येईल.
स्पर्धेचे नियम व अटी ह्या मुळातच जाहिरातीत दिल्या आहेत प्रथम, द्वितीय व तृतीय तसेच उत्तेजनार्थ असे पारितोषिक देऊन स्पर्धेतील स्पर्धेकांचा संस्थेच्या वतीने यथोचित मान सन्मान केला जाईल निबंध pdf फाईल,चित्र pdf file तसेच व वक्तृत्व ध्वनी फीत ही 4 मिनिटे ची एडिट करून दिलेल्या परिक्षकांच्या मोबाईलवर पाठवावी.

श्री निलेश गावंड सर (9768041430) अध्यक्ष-निगा फाऊंडेशन. श्री.निवास गावंड सर (9221345869) अध्यक्ष-सुयश क्लासेस आवरे, निबंध परीक्षक-सौ.उर्मिला म्हात्रे मॅडम (8108840650). चित्रकला परिक्षक श्री संतोष गावंड सर (9819924292), वक्तृत्व स्पर्धा परीक्षक श्री.रविंद्र पाटील सर (8793456854), श्री.नागेंद्र म्हात्रे सर, अध्यक्ष-सारडे विकास मंच (9833552403), श्री. आकाश घरत सर, माजी नेहरू युवास्वयंवसेवक, श्री. राकेश पाटील सर (9664770708) साई कृपा इंफॉर्मशन अँड टेक्नॉलॉजी चे सर्वेसर्वा, दिलेल्या परिक्षकांच्या मोबाइल क्रमांकावर आपली pdf fille अथवा वक्तृत्व चित्रफीत पाठवावी.सर्व इच्छूक स्पर्धकांना सुयश क्लासेस आवरे व निगा फाऊंडेशन च्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे की जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.