Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबीर

विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबीर आयोजित करणारे पहिले महाविद्यालय : 100 कोटी जनतेने लसीकरण करून घेतल्याबद्दल केक कापला

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुक्यात कोरोनाचे रुग्ण एकदम कमी झाले असले तरी कोरोनाचे संकट टळले नाही. त्यामुळे कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयाने कर्जत नगरपरिषदेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांसाठी लसीकरण केंद्राचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांसाठी लसीकरण शिबीर आयोजित करणारे हे जिल्ह्यातील पहिले महाविद्यालय ठरले. यावेळी देशातील शंभर कोटी जनतेने लसीकरण करून घेतल्याबद्दल केक कापून आनंद व्यक्त करण्यात आला.

महाविद्यालयाच्या सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून शिबिराचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका विशाखा जिनगरे, संस्थेचे खजिनदार प्रदीप श्रुंगारपुरे, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य विजय मांडे, ज्ञानेश्वर जाधव, डॉ. मनोज बनसोडे, डॉ. संगीता दळवी, प्राचार्य डॉ. विलास पिल्लेवान, दीपक बोराडे उपस्थित होते.

डॉ. भरत टेकाडे, डॉ. वैशाली जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. भारतातील 100 कोटी जनतेने लसीकरण झाल्याच्या निमित्ताने नगराध्यक्ष जोशी यांच्या हस्ते केक कापुन आनंद व्यक्त करण्यात आला. विजय मांडे यांनी, ‘आमच्या अभियांत्रिकी महाविद्यालयातही लसीकरण शिबिरासाठी सहकार्य करावे. जरी 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत महाविद्यालयांमध्ये लसीकरण शिबिरे आयोजित करावीत असे निर्देश असले तरी आम्ही त्या आधीच हा उपक्रम केला आहे.’ असे स्पष्ट केले. डॉ. बनसोडे यांनी ‘अद्याप कोरोनाचे संकट टळले नाही. शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी आमचे कायम सहकार्य राहील.’ असा शब्द दिला.

जोशी यांनी, ‘या भागाकडे असलेल्या रस्त्यापैकी नगरपालिका हद्दीतील रस्ता होण्यासाठी तसेच उर्वरित रस्ता होण्यासाठीही प्रयत्न करीन असे सांगितले. श्रुंगारपुरे यांनी, ‘या उपक्रमासाठी आपले सहकार्य महत्वाचे आहे.’ असे स्पष्ट केले. परिचारिका द्वारका जाधव यांनी लसीकरण केले. त्यांना महेश म्हात्रे, विजय जिनगरे, निकेत मंडावळे, विकी मोधळे आदींनी सहकार्य केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.