Press "Enter" to skip to content

आदिवासींचे दाखले काढण्याची मोहीम

पेण तालुक्यातील कातकरी आदिवासी लोकांचे जातीचे दाखले काढण्याची मोहिमेस सुरुवात

सिटी बेल | पेण | वैशाली कडू |

आचार्य विनोबा भावे आदिवासी वाडी, गागोदे ता. पेण येथील कातकरी आदिवासी लोकांचे जातीचे दाखले काढण्याची मोहीम मान उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू झाली आहे.

उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उरण तालुक्यातील एक हजाराहून जास्त आदिवासी बांधवांना जातीचे दाखले काढून दिले आहेत. सदर उल्लेखनीय काम पाहून मान उपविभागीय अधिकारी पेण श्री विठ्ठल इनामदार, मान तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे मॅडम, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी पेण मान अहेरराव मॅडम यांनी पेण तालुक्यातील कातकरी आदिवासी लोकांचे जातीचे दाखले काढण्याची मोहीम युद्ध पातळीवर सुरू करण्याची परवानगी दिली.

तसेच जे सहकार्य लागेल ते करण्याचे आश्वासन दिले. सदर मोहीम आचार्य विनोबा भावे आदिवासी वाडी येथून सुरू झाली असून पुढील एक महिन्यात सर्व वाड्यावर कॅम्प घेतला जाईल आणि सर्व आदिवासी बांधवांना जातीचे दाखले काढून देण्यात येतील.आचार्य विनोबा भावे आदिवासी वाडी वरील कॅम्प मध्ये मंडळ अधिकारी श्री मोकल, आदिवासी विकास निरीक्षक श्री जगदीश भानुशाली, तलाठी स्वप्नगांधा पाटील मॅडम आदिवासी विकास सहाय्यक श्री चव्हाण सर, वाडी वरील शाळेतले शिक्षक विष्णू म्हात्रे सर, जागृती पोवळे मॅडम, वर सई आश्रम शाळेतील मुख्याध्यापक झनकर सर आणि त्यांचे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सदर कॅम्प चे आयोजन ॲड नितीन जेधे यांनी केले. उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सर चिटणीस संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष प्रा. राजेंद्र मढवी सर, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर आणि रायगड भूषण दत्ता गोंधळी यांनी सदर कॅम्पचे नियोजन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.