Press "Enter" to skip to content

पोलादपुरातील रस्त्याची दुरवस्था

येलंगेवाडी ते धारेची वाडीपर्यंतचा रस्ता दिवाळीपर्यंत सुस्थितीत आणणार : आ.भरत गोगावले यांची ग्वाही

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वरील कशेडी घाटामधील भोगाव येलंगेवाडीपासून डोंगरातून महाड तालुक्यातील फौजी आंबावडे येथील धारेची वाडीपर्यंत जाणारा रस्ता पावसाळयामध्ये खुपच जीर्णावस्थेचा झाल्याने शिवशक्ती मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आ.गोगावले यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी दिवाळीपूर्वी पाऊस थांबल्यास येलंगेवाडी ते धारेची वाडीपर्यंतचा रस्ता दिवाळीपर्यंत सुस्थितीत आणणार, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली.

गणेशोत्सवावेळी गावाकडे येऊ न शकलेल्या महाड तालुक्यातील दक्षिणटोक भागातील अनेक चाकरमान्यांनी नवरात्रौत्सव काळामध्ये गावाकडे जाताना कशेडी घाटातील भोगाव येलंगेवाडीतील शॉर्टकट रस्त्याचा वापर करून कमी वेळेत गावाकडे पोहोचण्याचा प्रयत्न केला असता या रस्त्यावर अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी दरडी कोसळल्याचे तसेच रस्त्यावरून माती तसेच मुरूमाचे ढिग अनेक ठिकाणी साचल्याने दुचाकी तसेच रिक्षा, जीप तसेच मोटारगाडयांना या रस्त्यावरून वाहतूक करणे जिकिरीचे झाल्याने फौजी आंबावडेतील धारेची वाडीतील ग्रामस्थ आणि तरूणांच्या शिवशक्ती तरूण मित्र मंडळातर्फे महाड विधानसभा मतदार संघाचे आमदार भरत गोगावले यांना निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले.

यावेळी आ.गोगावले यांनी ग्रामस्थांना दिवाळीपर्यंत पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन हा रस्ता पूर्णत्वास जाईल, अशी ग्वाही दिल्याची माहिती सचिन पवार यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.