Press "Enter" to skip to content

काॅंग्रेस बदलत आहे…

महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली रायगडात काॅंग्रेसची घौडदौड : नंदराज मुंगाजी

सिटी बेल | पनवेल|

महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली आता रायगड जिल्हा काँग्रेस भरारी घेत असुन काॅंग्रेस पक्षाची आता खऱ्या अर्थाने घौडदौड सुरु झाली असल्याचे मत काॅंग्रेसचे पनवेल तालुका उपाध्यक्ष नंदराज मुंगाजी यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस बदलत आहे या शीर्षकाखाली सिटी बेल वृत्त समूहाकडून रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली जात आहेत. यावेळी नंदराज मुंगाजी यांनी आपली परखड मते व्यक्त केली.

मुंगाजी म्हणाले की, महेंद्र घरत यांच्या सारखा तडफदार कामगार नेता आज रायगड जिल्ह्याच्या काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळत आहेत. त्यांच्या कामगार क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा आणि एकंदरीतच राजकीय कारकीर्दीचा अनुभव काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी फायद्याचा ठरत आहे. गेल्या काही वर्षात काँग्रेसला आलेली मरगळ आता झटकली गेली आहे. आणि आमच्या सारखा कार्यकर्ता पक्ष कामासाठी तन-मन-धन अर्पून कामाला लागला आहे.

आतापर्यंत काँग्रेस पक्षाला रायगड जिल्ह्यात इतर पक्ष फक्त गृहीत धरत होते. परंतु आता ती परिस्थिती राहिली नाही. महेंद्र घरत यांच्यात ती धमक आहे की रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष नंबर एकचा पक्ष होऊ शकतो. रायगड जिल्ह्यात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत निवडणुका यामध्ये नक्कीच काँग्रेस पक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी बजावेल असा विश्वास नंदराज मुंगाजी यांनी व्यक्त केला.

न्हावा शेवा – शिवडी सागरी सेतूला बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे नाव देण्याची मागणी योग्यच

न्हावा शेवा – शिवडी सागरी सेतूला बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे नाव देण्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी केलेली मागणी अतिशय योग्य असून संपूर्ण काँग्रेस कार्यकर्त्यांचा त्यांचा या मागणीला पाठिंबा आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री बॅरिस्टर अंतुले हे या रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते आहेत. अंतुले साहेबांचे जिल्ह्यावर अनंत उपकार आहेत. आज जिल्हा रायगड या नावाने ओळखला जातो हे नाव अंतुले साहेबांनीच दिले आहे. या रायगड जिल्ह्यात जी औद्योगिक क्रांती झाली ती अंतुले साहेबांमुळेच. रायगड जिल्ह्यातील अनेक औद्योगिक वसाहती आरसीएफ सारखा मोठा प्रकल्प ही सर्व अंतुले साहेबांची देण आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील एखाद्या मोठ्या प्रकल्पाला अंतुले साहेबांचे नाव लागलेचं पाहिजे ही भूमिका महेंद्र घरत यांनी मांडली याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.