Press "Enter" to skip to content

कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर

तालुका विधी सेवा समिती,कर्जत यांच्या वतीने ग्रुप चिंचवली – गणेगाव येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत नसरापूर हद्दीतील मौजे चिंचवली – गणेगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भारतभर जागरूकता अभियान पोहचविण्यासाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.

ग्रामपंचायत कार्यालयात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक अ‍ॅड.संदीप घरत,अ‍ॅड. प्रमिला चव्हाण,अ‍ॅड.भारती ढाकवळ,माधुरी कराळे, कर्जत कोर्टाचे लेखनिक शरद कांबळे यांनी सार्वजनिक सुविधा बाबत मार्गदर्शन, प्लास्टिक कचरा संकलन व स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी कश्याप्रकारे कार्य करायला हवे दारूबंदीसाठी काय करायला हवे याची माहिती दिली.

ग्रुप ग्रामपंचायत नसरापूरच्या ग्रामस्थांना कायद्याची माहिती आणि समाजात येणाऱ्या अनेक अडचणींना सामोरे जातांना कोणालाही कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सरपंच प्रमिला मोहिते, कर्जत तालुका युवासेना सचिव उपसरपंच अ‍ॅड.संपत पांडुरंग हडप यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम राबविण्यासाठी प्रयन्त केले.

या कार्यक्रमासाठी सदस्या अमिता देशमुख, सदस्या दीपा कोळंबे, ग्रामसेवक नितीन वैद्य,समाजसेवक संतोष मोहिते, समाजसेवक दशरथ देशमुख, अ‍ॅड.श्वेता हडप, ग्रामपंचायत कर्मचारी मोतीराम कोळंबे, शरद तिखंडे, रोशनी कोळंबे, अंगणवाडी सेविका सीमा देशमुख,महिला बचत गटाच्या योगिनी कोळंबे, प्रणय गोतारणे,गौतमी गायकवाड उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.