Press "Enter" to skip to content

पोलीस भरती परीक्षा

चोख पोलीस बंदोबस्तात रसायनीत पारदर्शक पोलिस भरती लेखी परीक्षा

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

गेल्या अनेक वर्षापासूनचा पोलीस भरतीचा मार्ग सुखकर झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक विद्यार्थी गेले काही वर्ष पोलीस भरती लांब गेल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.

मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अनेक ठिकाणी शिथिलता केली असताना पोलीस भरतीचाही मार्ग सुकर झाला आहे, त्या अनुषंगाने पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान,18 ऑक्टोंबर रोजी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलीस भरती परीक्षा सुरू असून रसायनीतील पिल्लई एचओसी इंटरनॅशनल स्कूलमध्ये रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्तात पोलिस भरती लेखी परीक्षा सुरू आहे.परिक्षेच्या एक दिवस अगोदरपासूनच पिल्लई परिसरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

यावेळी मुंबई पुणे जुन्या महामार्गावरील दांडफाटा येथे बाहेरगावाहून आलेल्या परिक्षार्थीसाठी तीन आसनी रिक्षातून मोफत प्रवासाची सोय रसायनी पोलिसांनी केली होती.तर राज्यातील विविध भागातून एक दिवस अगोदर आलेल्या परिक्षार्थीसाठी मोहोपाडा जनता विद्यालयात राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती.त्यांच्या जेवनापासून नाश्ता,चहा पाण्याची व्यवस्था रसायनी पोलिस ठाण्याकडून मोफत करण्यात आली होती.

याठिकाणी येणाऱ्या सर्व विद्यार्थीवर्गाला सोयी सुविधा मिळाव्यात म्हणून पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांचे मार्गदर्शनाखाली डिवाएसपी संजय शुक्ला, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी मोफत नाश्ता, मोफत प्रवास सेवा अशा विविध सेवा उपलब्ध करून दिल्याने रसायनी पोलीस ठाण्याच्या कार्याचे कौतुक होत आहे.परिक्षार्थींना मोहोपाडा अचानक मैदानावर वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

तसेच रसायनी पोलिसांकडून परिक्षार्थींना मार्गदर्शन होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.तर पिल्लईं स्कुलनजीक परिक्षार्थी साठी नाश्ता,चहा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था रसायनी पोलिस ठाण्याकडून करण्यात आली आहे.याठिकाणी पारदर्शक कारभार सुरू असून ठिकठिकाणी सी.सी.टिव्ही कँमेरा, चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.पोलिस भरती लेखी परिक्षेसाठी परिक्षार्थीना कोणतीही अडचण येवू नये, यासाठी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी लक्ष घातले आहे.रसायनी पोलिसांनी परिक्षार्थींना केलेल्या व्यवस्थेबद्दल अनेक परिक्षार्थींनी रसायनी पोलिसांचे कौतुक केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.