Press "Enter" to skip to content

विद्यार्थ्यांना मास्क वाटप

माजी आमदार मनोहरशेठ भोईर सामाजिक संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मास्क वाटप

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

कोरोना काळात गेले दीड वर्ष बंद असलेल्या शाळा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 4 ऑक्टोबर 2021 रोजी शाळा सुरू करण्याचे आदेश दिले, त्या बरोबर “माझे विद्यार्थी माजी जबाबदारी” ही संकल्पना सुध्दा मांडली. त्यांच्या संकल्पनेचा आदर करत माजी आमदार मनोहरशेठ भोईर सामाजिक संस्था, नवीन शेवा यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय व आर्ट अँड सायन्स ज्युनिअर कॉलेज, नवीन शेवा मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मास्क देण्यात आले.

सदर मास्क शिवसेना जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संतोष म्हात्रे सर यांच्याकडे सोपविण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उरण शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, माजी आमदार मनोहरशेठ भोईर सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष श्री दिनेश घरत, सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ नवीन शेवाचे अध्यक्ष श्री पंकज सुतार व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.