Press "Enter" to skip to content

रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा युवक मेळावा संपन्न

तरुणांच्या क्रेझमध्ये आ.अनिकेतभैया तर आमच्या दहा पावले पुढे : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात आ.निलेश लंकेंची स्तुतिसुमने

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

रोहा येथे संपन्न झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांच्या मेळाव्यात रायगड जिल्ह्यातील युवकांची झालेली अफाट गर्दी पाहून या मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन आमदार मा.अनिकेतभाई तटकरे यांनी केले त्याबद्दल आमदार निलेश लंके यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. कौतुक करीत असताना आ. लंके यांनी सांगितले की, आतापर्यंत आम्हाला वाटत होत की, तरूणांमध्ये फक्त आमचीच क्रेझ आहे. परंतु युवा मेळाव्यासाठी एवढ्या तरुणांची उपस्थिती पाहून अनिकेतभैया तर आमच्या दहा पावले पुढे आहे अशाप्रकारची स्तुतिसुमने आ. निलेश लंके यांनी आ. अनिकेतभाई तटकरे यांच्यावर उधळली.

राष्ट्वादी काँग्रेसच्या रोहा येथील युवक मेळाव्यात मार्गदर्शन करतांना पारनेरचे आमदार निलेश लंके पुढे म्हणाले की, कोलाड वरुन रोहातील कार्यक्रम स्थळी निघालेली तरुणांची भव्य बाईक रॅली पाहून एकवेळ तर असे वाटले की, आपणही गाडीतून उतरून बाईकवर बसून रॅलीत सहभागी व्हावे एवढी तरुण कार्यकर्त्यांची फौज अनिकेतभैयाने रायगड जिल्ह्यात तयार केली आहे.

आ. अनिकेत भैयांची तरुणांमध्ये असलेली क्रेझ मला खुप भावली असल्याने माझ्या मतदारसंघातील युवा मेळाव्याला अनिकेत भैयाला प्रमुख पाहुणे म्हणून मी आजच निमंत्रण देऊन टाकतो असेही यावेळी आ. निलेश लंके यांनी जाहीर केले. आ. निलेश लंके यांनी आपल्या खुमासदार शैलीत सादर केलेल्या भाषणाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या तरुणाईने उत्स्फूर्तपणे दाद दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.