Press "Enter" to skip to content

प्रा.आर.बी.पाटील यांची निवड

अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी रसायनीतील प्रा.आर.बी.पाटील यांची निवड

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

पुणे येथील साने गुरुजी स्मरकातील मध्यवर्ती कार्यालयात अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेची वार्षिक सर्वसाधारण संपन्न झाली.यावेळेस नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबादारी रायगड जिल्ह्यातील रसायनी येथील पिल्ले महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. रमेश पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.

मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा मुलभूत अधिकार असताना सरकार शिक्षणणाचे खाजगीकरण करू पाहत आहे. शिक्षणाच्या या खाजगिकरणाला विरोध करून शून्य ते चौदा वयोगटातील प्रत्येक बालकाला के.जी. ते पी.जी. पर्यंत मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या मागणीसाठी काम करणाऱ्या अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी रायगड जिल्ह्यातील प्राध्यापक रमेश भालचंद्र पाटील उर्फ आर.बी.पाटील सर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जेष्ठ समाजवादी विचारवंत रावसाहेब कसबे, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री दिवंगत भाई वैद्य, माजी शिक्षक आमदार कै. जयवंत ठाकरे अशा दिग्गजांनी पदभार सांभाळलेल्या संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हे रायगड जिल्ह्यातील आर. बी. पाटील यांच्या रूपाने मिळाल्याने रायगडसह महाराष्ट्रातील विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.