Press "Enter" to skip to content

युवकांनी केली गावाची स्वच्छता

राष्ट्रवादी युवा कॉंग्रेस तर्फे चणेरा गावची स्वच्छता

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

चणेरा येथील राष्ट्रवादी युवा कॉंग्रेस तर्फे संपूर्ण चणेरा गाव व मंदिराची स्वच्छता करण्यात आली. चणेरा गावचे भावी युवा सरपंच तसेच राष्ट्रवादी काँग्रेस रोहा तालुका युवा संघटक श्री मयुरशेठ मनोहरराव विचारे यांच्या अध्यक्षतेखाली चला युवा घडवू या नवे पर्व युवा सर्व या घोषवाक्याच्या अनुशंगाने चणेरा गावातील सर्व युवकांच्या मदतिने ही स्वच्छता गावात करण्यात आली तसेच गावातील प्रसिद्ध व नवसाला पावणारा बापदेवजी आराध्य ग्रामदैवत यां मंदीराची स्वच्छता व रोशनाई करण्यात आली तसेच चणेरा गावामध्ये स्वच्छता जनजागृती रॅली काढून स्वच्छतेचे महत्त्व गावकऱ्यांना सांगितले लोकांसह भागातुन ग्राम स्वच्छता करता येते हे या युवकांनी दाखवून दिले आहे.

या स्वच्छता अभियानामध्ये चणेरा गावातील युवक , हर्षद सालवी , ओमकांर जोशी, रोहीत पवार, अनिकेत मयेकर, सुहास गंभे,मानव सालवी, यश काटे, आशिष देसाई, सौरभ मनहास,हर्षद ढोळे,दर्शन गंभे, सर्वेश आरेकर, दीप चालते, संस्कार सालवी, दिगंबर जाधव, रोशन गंभे, प्रतम तेलंगे , हितेश खैरे, राज देसाई, आदि युवकांनी गावाची स्वच्छता पूर्ण करून एक नवा इतिहास चणेरा पंचक्रोशीत निर्माण केला आहे, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.