Press "Enter" to skip to content

कर्जतमध्ये कोव्हीड लस उपलब्ध

कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध आहे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे : तहसिलदार विक्रम देशमुख यांचे आवाहन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कोविड प्रतिबंधक लस उपलब्ध आहे सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन कर्जत तालुक्याचे तहसिलदार विक्रम देशमुख यांनी जनतेला केले आहे.

कर्जत तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 52 हजार 581 इतकी आहे, तालुक्यात कर्जत आणि माथेरान या दोन नगरपरिषद यांचा समावेश आहे. थंड हवेचे पर्यटन स्थळ म्हणजे माथेरान ची लोकसंख्या 3 हजार 838 आहे , माथेरान मध्ये कोविड प्रतिबंधक लसीकरण 100 टक्के पूर्ण झाले आहे, कर्जत नगरपरिषदेची लोकसंख्या 29 हजार 654 इतकी आहे, कर्जत नगरपरिषद हद्दीत 28 हजार 592 जणांनी लसीकरण करून घेतले आहे म्हणजे ही टक्केवारी 97 टक्के इतकी आहे, तर दोन नगरपरिषद वगळता कर्जत ग्रामीणची लोकसंख्या 1 लाख 19 हजार 89 इतकी आहे, ग्रामीण भागात आता पर्यत 1 लाख 17 हजार 548 जणांनी लसीकरण केले आहे म्हणजे 98.71 टक्के इतके लसीकरण झाले आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या पाठपुराव्यामुळे व मार्गदर्शनामूळे मागील 10 दिवसापासून लसीकरणाचा वेग वाढला आहे.
सध्या रायगड जिह्यात कर्जत तालुका लसीकरणा बाबत दुसऱ्या क्रमांकावर आहे, लस उपलब्ध आहे राहिले आहेत त्यांनी त्वरित लसीकरण करून घ्यावे असे आवाहन तहसिलदार विक्रम देशमुख यांनी केले आहे,लसीकरणामुळे पॉझिटिव्ह चे प्रमाण कमी आहे असे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी सांगितले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.