Press "Enter" to skip to content

वारा

वारा
थंडगार वारा सुखवी मनाला
पानाफुलांवरील झुलवी दवांना
धरतीच्या कुशीत हिरवी तृण पर्णे
वारा देई त्यास सुंदर तरंग लहरे

हाच वारा घाली पिंगा अंगणात
माहेरी जाऊनी करी सुखाची बरसात
वारा घाली शीळ मंजुळ स्वरात
मनाला डोलवी आनंद होई मनात

सोसाट्याचा वारा मन सैरभैर करी
परी क्षणभरात मन स्थिर ही करी
वारा पाखरांच्या पिलांना जोजवी प्रेमाने
जसे माय लेकराला जोजवी मायेने

पक्षांच्या पंखांना भरारी देई वारा
मन मुक्त होऊनी संचार आकाशी करा
पहाटवारा मन धुंद गंधीत करी
कुंजवनातील सुगंध सर्वत्र पसरवी

कडक उन्हात वारा उन्हाच्या झळा देई
परी तोच वारा थंड वाऱ्याची झुळूक देई

असा हा वारा अनेक रुपांनी सजला
हाच असे खरा निसर्गाचा नजराणा
वाऱ्या सम आपणही रहावे
जीवनाचा आनंद लुटत रहावे

नयना पेंढारकर, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.