Press "Enter" to skip to content

पोलादपुरात रस्त्याचे भूमिपूजन

ओंबळी गवळवाडी येथील रस्त्याचे आमदार गोगावले यांच्याहस्ते भूमिपूजन

सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर |

तालुक्यातील अनेक वर्षांपासून तंटामुक्त राहिलेल्या रत्नागिरी जिल्हयातील खेड आणि रायगड जिल्ह्यातील पोलादपूरच्या सीमेवरील ओंबळी गावातील गवळवाडीतील रस्त्यासाठी महाड विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आ.भरत गोगावले यांनी सदर रस्त्याच्या कामासाठी केलेल्या पाठपुराव्यामुळे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

या भुमिपूजन सोहळयासाठी पोलादपूर संपर्कप्रमुख किशोर जाधव, रायगड जि.प.सदस्य चंद्रकांत कळंबे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, पोलादपूर शहर प्रमुख सुरेश पवार, नगरसेवक प्रकाश गायकवाड, नागेश पवार, विभाग प्रमुख सतीश शिंदे, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर दरेकर तसेच अविनाश शिंदे, दशरथ उतेकर, ओंबळी ग्रामपंचायत सरपंच शशिकांत चिकणे तसेच विभागातील आणि मुंबईतील शिवसेना युवा सेनेचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते,

आ. भरत गोगावले यांनी ओंबळी गवळवाडीचा याठिकाणी मतदान कोणत्या पक्षाला होत आहे, याकडे न बघता केवळ या विधानसभा मतदार संघातील जनतेने तीनवेळा विधानसभेवर निवडून पाठविल्यामुळे रस्ता मंजूर करून आणल्याबद्दल ओंबळी गवळवाडी ग्रामस्थांनी आणि मुंबईकर चाकरमानी यांनी आ.गोगावले यांचे विशेष आभार मानले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.