Press "Enter" to skip to content

दसर्याला जेवणारी गारमाता

भक्तांची श्रद्धा ; दसरादिनी कराडे खुर्दची जागृत गारमाता देवी जेवण करते, दर्शंनाला भाविकांची गर्दी

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसी हद्दीतील कराडे खुर्द गावाच्या प्रवेशव्दाराजवळ जागृत गारमातेचे सुमारे 130 वर्षांपूर्वींचे मंदिर आहे. या मंदिराची स्थापना 1823 मध्ये पेशवेकालीन माणकोजीचे दिवाण मल्हार राघो कुलकर्णी यांनी केली होती.त्यानंतर मंदिराचा डागडुजीकरण व इतर खर्च सचिन कारंदे करीत आहेत.

या परिसरात पेशवेकालीन सर्वंत्र शेती असताना मल्हार कुलकर्णी यांनी मंदिरासमोरील माती काढून कराडे खुर्द गावात वाडा बांधला.माती उत्खलनाने या मंदिरासमोर भव्य तलाव पाहायला मिळते.गारमातेने दृष्टांत दिल्याने हे मंदिर 130 वर्षांपूर्वी उभारण्यात आल्याचे जाणकार सांगत आहेत.कराडे खूर्द़ची गारमाता दसरादिनी जेवण करते यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे दिसून येते.

नवरात्रीत जागृत गारमातेचा दर्शंनाला देवीचे वाहन वाघ न चुकता मंदिरात येवून जातो.तसेच दसरादिनी गारमाता दुपारी जेवण करते.एकेकाली देवी जेवताना पाहण्यासाठी गेलेल्या भक्ताचे डोळे गेल्याची आख्यायिका आहे.कराडे खुर्द येथील गारमातेचे जागृत देवस्थान असल्याने देवी भक्तांच्या नवसाला पावते.दस-याच्यादिवशी देवी जेवणही करते.

दरम्यान सन 1989 मध्ये रसायनी पाताळगंगा परिसरात महापूर झाल्याने सर्वंत्र मनुष्यहानी झाली.परंतू कराडे खुर्द गावाला लागूनच पाताळगंगा नदी असतानाही शिवाय गाव पाण्यात बुडाले असतानाही झालेल्या महापूरात कराडे खुर्द ग्रामस्थांचे काहीही नुकसान झाले नाही.गारमातेने संरक्षण केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.तसेच अनेकांना प्रचिती आल्याचे नागरिक सांगतात.नवरात्रोत्सवात दसरादिनी शनिवारी सकाळपासूनच देवीच्या मंदिरात पूजापाठ केला जातो.

यादिवशी मंदिरातील केलेली सजावट भक्तांना आकर्षंण ठरते.कराडे खुर्दंच्या गारमाता देवीच्या जवळ महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती देवी आहेत. दसरादिनी दुपारी 12:45 वाजता देंवींना विविध पदार्थांचे जेवण नैवेद्य म्हणून ठेवले जाते.यावेळी देवी गाभारा परिसर अर्ध्यातासाकरिता बंद करून सभामंडपात भक्तगण सप्तशती पुजा मंत्राने जप करतात.यानंतर देवीचा गाभारा खुला करुन देवीसाठी ठेवलेले जेवण पाहिले असता जेवणातील काही पदार्थांवर हाताचे ठसे उमटल्याचे दिसून येते.यावेळी दर्शंनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचे दिसून येते.यासाठी ग्रामस्थांसह सचिन कारंदे,माजी सरपंच विजय मुरकुटे अधिक परिश्रम घेतात.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.