Press "Enter" to skip to content

कर्जतमध्ये विकासकामांचा धडाका

कर्जत नगर परिषद हद्दीतील विविध कामांचे लोकार्पण : 30 लाख 48 हजार 612 रुपयांची कामे

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

विजया दशमी म्हणजेच दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कर्जत नगरपरिषद क्षेत्रातील सुमारे 30 लाख 48 हजार 612 रुपयांच्या विविध कामांचा लोकार्पण सोहळा आज दि.15 ऑक्टोबर रोजी संपन्न झाला.

दलित वस्ती योजनेअंतर्गत सुमारे 18 लाख 1 हजार 42 रुपये खर्च करून कर्जत शहरातील बुद्ध नगर समाज मंदिरामध्ये पहिल्या मजल्यावर सिलिंग व समाज मंदिरामध्ये रंगकाम करणे व मुख्य प्रवेशद्वारावर लोखंडी दरवाजा बसविणे, दलित वस्ती योजनेअंतर्गत सुमारे 5 लाख 95 हजार 645 रुपये खर्च करून शिवम अपार्टमेंट ते नाना निकम यांचे घरापर्यंतच्या गटारा वरील स्लॅप टाकणे तसेच स्वच्छ भारत अभियान प्रोत्साहनपर निधी अंतर्गत 6 लाख 51 हजार 925 रुपये खर्च करून कर्जत बुद्ध नगर जवळील कोपरा गार्डन या कामांचा लोकार्पण सोहळा नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका पुष्पा दगडे, प्राची डेरवणकर, मधुरा चंदन, भारती पालकर, सुवर्णा निलधे, संचिता पाटील, वैशाली मोरे, नगरसेवक राहुल डाळींबकर, बळवंत घुमरे, विवेक दांडेकर, हेमंत ठाणगे तर आरपीआय चे नेते मारुती गायकवाड, धर्मानंद गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष उत्तम जाधव, शरद मोरे, भाजपचे नेते दिपक बेहेरे, रमेश मुंढे, मंदार मेहेंदळे, माजी नगरसेवक दिपक मोरे, अरविंद मोरे, दिपक भालेराव आदी सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.