Press "Enter" to skip to content

रोह्यात जागरुकता अभियान

रोहा तालुका विधि सेवा समिति द्वारे जागरुकता अभियान व पोहच कार्यक्रमांतर्गत पथ नाट्यांचे सादरीकरण

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

राष्ट्रीय विधी सेवा समिती व सुराज्य प्रतिष्ठान, प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या कडील निर्देशा प्रमाणे दिनांक २/१०/२०२१ ते १४/११/२०२१ पर्यंत भारतभर जागरूकता अभियान व पोहच कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने तालुका विधी सेवा समिती रोहा व सुराज्य प्रतिष्ठान संस्था रोहा अंतर्गत स्पंदन संस्था , जीवनधारा स्वयंसेवी संस्था कोलाड यांच्या संयुक्त विद्यमाने रोहा अष्टमी नगर परिषद समोरील पथरस्त्यावर पथनाट्यचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रम जीवनधारा स्वयंसेवी संस्था कोलाड यांनी महीला अत्याचार व महीलांचे कायदे या संकल्पनेवर आधारित पथनाट्याचे सादरीकरण करून समाजा मध्ये महीलांच्या समस्या व उपाय या वर जागृती निर्माण करण्याचे कार्य केले .

तसेच सुराज्य प्रतिष्ठान संस्था रोहा अंतर्गत स्पंदन संस्था रोहाचे बालकलाकारांनी बालकांचे शिक्षणचे अधिकार व अधिकार या संकल्पनेवर आधारित विषयावर पथनाट्य सादरीकरण करून मोफत व शक्तीचे शिक्षणाचे महत्त्व उपस्थितांना पटवुन दिले .सदर पथनाट्य सादरीकरण करताना
जीवनधारा स्वयंसेवी संस्था कोलाड तर्फे गुलाब वाघमारे , सुवर्णा वेदक,सुवर्णा जाधव , सुप्रीया तुपकर ,सुरेखा गुजर , सुनीता पवार ,भारतीय जाधव , कल्पीकता गोठम , अलका वाघमारे , सुचिता वाघमारे, चंद्रा वाघमारे , ढोलकी वादक हरिश्चंद्र वाघमारे , स्पीकर सुरेश वाघमारे यांनी सहभाग घेतला तर सुराज्य प्रतिष्ठान संस्था रोहा अंतर्गत स्पंदन संस्थेचे सिमरन , सर्वेश , आर्या, तनिष्क , यस,अर्थव , पुर्वी , संस्कृती बी , अविनाश, आदित्य , अनुज , आणि सर्व कलाकारांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणाने उपस्थितांची प्रेक्षकांनची मने जिंकून घेतली.

या पथनाट्यांचे सादरीकरणा च्या वेळी रोहा न्यायालयाचे न्यायाधीश मा. यस डी कमलाकर , विधीज्ञ श्रीमती देवयानी मोरे,श्रीमती मयूरा मोरे ,जीवनधारा संस्थेची संचालीका श्रीमती हिल्डा फर्नांडिस, संस्थेचे कार्यकर्ते रवि जाधव , चैत्राली म्हात्रे , रोमीला दोडीया , विनारसी , सुराज्य प्रतिष्ठान रोहाचे किरण कानाडे ,श्रीमती प्रियंका कांबळे , तसेच कलाकारांचे पालक , स्पंदन संस्थांच्या संचालिका श्रीमती उमा कोर्लेकर , कर्मचारी वृंद रोहा नगर परिषद, रोहा पोलीस ठाणे , रोहा वाहतूक शाखा , तसेच कर्मचारी वृंद रोहा न्यायालयीन रोहा आदी मान्यवर उपस्थित होते या पथनाट्यांचे सादरीकरणा च्या वेळी रोहा अष्टमीकर नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.