Press "Enter" to skip to content

लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम

दिवंगत सुरेखा सुभेकर यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त आरोग्य शिबिर

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम घेताना दिवंगत सुरेखा सुभेकर यांचा तृतीय स्मृती दिन साजरा करण्यात आला .
लायन विवेक सुभेकर यांच्या मातोश्री दिवंगत सुरेखा सुभेकर यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून आरोग्य शिबीर व अन्नदान कार्यक्रम घेण्यात आला .

नेहमीच्या पद्धतीने चालणाऱ्या गोष्टींना वळण देत व कालानुरुप आपल्या परंपरेत बदल करीत एक वेगळ्या पद्धतीने स्मृती दिन साजरा केला. यावेळी अंगणवाडी सेविका यांना ‘ग्रामीण महिलांचे आरोग्य ‘ यावर मार्गदशन सन्माननीय एमजेएफ लायन वैद्य यशवंत चित्रे यांनी विवीध आजारांवर झाड पाला सारखी आयुर्वेदीक औषध कशी घ्यावी व कशा प्रकारे असावीत यावर विस्तृतपणे सांगीतले . याच्या संपुर्ण टिप्स व प्रिन्टेड नोटस् देवून या सेविकांना महत्वाची मोलाची माहीती दिली. यावेळी त्यांचे प्रश्न, त्यांचे आजार याचेही निदान करून त्यांना त्यावर उपाय सांगीतला.

यावेळी अंगणवाडी सेविकांच्या मुख्याधिकारी श्रीमती भाकरे यांनी आपल्या मनोगतात लायन्स क्लबचे व लायन यशवंत चित्रे यांचे आभार मानले व यापुढे हाच कार्यक्रम आमच्या इतर विभागातील सेविकांसाठीही राबवावा हे सांगीतले. या प्रसंगी डायबीटीस तज्ञ वैद्य शर्मा यांनीही मधुमेहावर मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमास प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती सैंदाणे व सौ स्वाती पाटील यांच मोलाच सहकार्य मिळाले .

यावेळी सोबत लायन सभासद अध्यक्ष लायन सुजित महागावकर, चार्टड प्रेसिडेंट लायन प्रकाश जैन, खजिनदार लायन संतोष शहासने, डायरेक्टर – लायन सुजाता जवके, लायन दौलत मोदी, लायन संतोष मांडवर, लायन स्वप्नाली मांडवकर, लायन श्वेता सुभेकर, लायन अनिल गिते, लायन विशाल शिंदे, लायन लेडी प्राची महागावकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन एमजेएफ लायन विवेक सुभेकर यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.