Press "Enter" to skip to content

आ.अनिकेत तटकरेंची नवरात्रोत्सवास भेट

नवरात्रौत्सवानिमित्त आ.अनिकेतभाई तटकरे यांनी घेतले ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेचे दर्शन

कानिफनाथ मंदिर, साईबाबा-राधाकृष्ण मंदिर व मरीआई मंदिरातील नवरात्रौत्सवास भेट

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

विधानपरिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी रात्री ९ वाजता नवरात्रौत्सवानिमित्त नागोठण्यात भेट देऊन ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता, व्याघ्रेश्वर व भैरवनाथ या देवतांचे दर्शन घेतले. याचबरोबर आ. अनिकेतभाई तटकरे यांनी शहरातील के.एम.जी. विभागातील मराठा आळीतील कानिफनाथ मंदिर व गवळ आळीतील साईबाबा-राधाकृष्ण मंदिरात नवरात्रौत्सवानिमित्त भेट देऊन देवतांचे दर्शन घेतले.

आ. अनिकेतभाईंचा वाढदिवस १५ आ‌ॅक्टोबर रोजी असल्याने त्याआधी त्यांनी नवरात्रौत्सवानिमित्त श्री जोगेश्वरी मातेचे दर्शन घेतल्याने मंदिरात पूजेसाठी उपस्थित असलेले श्री रामेश्वरस्वामी यांनी आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या दिर्घायुष्यासाठी तसेच राजकारण व समाजकारणातील त्यांच्या यशस्वी वाटचालीसाठी श्री जोगेश्वरी मातेजवळ प्रार्थना केली. यावेळी मंदिराच्या पुजारी सौ. अनिता अरुण गुरव यांनीही आ. अनिकेतभाई तटकरे यांचे औक्षण करुन श्री जोगेश्वरी मातेजवळ प्रार्थना केली.

दरम्यान विधानपरिषदेत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर श्री जोगेश्वरी माता विश्वस्त समितीचे अध्यक्ष नरेंद्रशेठ जैन यांनी नागोठणे ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेकडे केलेला नवस फेडण्यासाठी आ. अनिकेतभाई तटकरे नवरात्रौत्सवातच १७ आ‌ॅक्टोबर, २०१८ रोजी आल्याच्या आठवणींना यावेळी उजाळा मिळाला.

यावेळी श्री जोगेश्वरी माता देवस्थान विश्वस्त समितीचे सचिव भाई टके, विलास चौलकर, हरिषशेठ काळे, उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब टके, उपाध्यक्ष विनय गोळे, जुगनशेठ जैन, सुनिल लाड, अनिल नागोठणेकर, राजा गुरव, भारत भोय, ग्रा.पं. सदस्य अतुल काळे, दिनेश घाग, रोहिदास हातनोलकर, किशोर नागोठणेकर, प्रकाश मोरे, राजेश पिंपळे, मनोज टके, चेतन टके, कुणाल तेरडे, अॅड. श्रीकांत रावकर, प्रथमेश काळे, मंदार चितळे, धृव सोष्टे, सिध्देश काळे, श्रीपाल जैन, डाॅ. सनी धात्रक, गुड्डु मोदी, गोट्या राजिवले, जगदीश दिवेकर, शंकर भालेकर, संदिप कोळी, निखील शिर्के, योगेश गुरव, नाना पवार आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

आ.अनिकेतभाई तटकरे यांनी नंतर मराठा आळीतील श्री कानिफनाथ मंदिरात जाऊन नवरात्रौत्सवानिमित्त दर्शन घेतले. यावेळी कुंभारआळी-मराठाआळी नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष विपुल हेंडे, उपाध्यक्ष अक्षय नागोठणेकर, संतोष नागोठणेकर, आनंद लाड, किरण लाड, राकेश चितळकर, उदय लाड आदींसह उत्सव समितीने आ. अनिकेतभाई तटकरेंचे स्वागत केले. त्यानंतर आ. अनिकेतभाईंनी गवळ आळीतील साईबाबा राधाकृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यावेळी मंदिराचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष, माजी सरपंच विलास चौलकर यांनी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने आ.अनिकेतभाई तटकरे यांचे स्वागत केले. नंतर आ.अनिकेतभाई तटकरे यांनी येथील मरीआई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी बंगलेआळी ग्रामस्थांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.