Press "Enter" to skip to content

नवरात्रोत्सव २०२१

भक्तांच्या नवसाला पावणारी वरसगाव येथील तुळजाभवानी माता

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

मुबंई गोवा महामार्गावरील निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या आदिशक्ती श्री तुळजाभवानी शिवराया देवस्थान कोलाड पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या वरसगाव या ठिकाणी असणारी भक्तांच्या नवसाला पावणारी भवानी माता असुन वर्षानुवर्षे पारंपारिक पद्धतीने चालत आलेला नवरारत्रोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा केला जात असल्याचे देवस्थानच्या संस्थापक संचालीका कोकणातील ज्येष्ठ कवयित्री तथा साहित्यिक चंदाराणी कोंडाळकर यांनी सांगितले.

सदर सुरू असलेला देवीचा नावरात्रो उत्सव कोणताही कार्यक्रम नाही की माहेरवाशिंना पाचारण सुद्धा केले नाही. अत्यंत साधेपणाने साजरा होत असलेला हा नवरात्रोत्सव शासनाने घालून दिलेल्या नियमांप्रमाणे साधेपणाने, तसेच सुरक्षित अंतर ठेवून, हातपाय स्वच्छ धुऊन, मास्क लावून भक्त भवानी मातेचे दर्शन घेत आहेत. तुळजाभवानी शिवराय देवस्थानाला भेट दिली असता असे समजले की निसर्गाच्या सौंदर्यात बालपणापासूनच तुळजाभवानी शिवरायांच्या भक्त कवयत्री चंदाराणी दिवाडकर- कोंडाळकर यांनी बांधलेला भव्य माय भवानी शिवराया देवस्थान आहे. घटस्थापना होण्याअगोदर एक महिना कार्यक्रमाची रूपरेखा आखून अगदी सुरळीतपणे कोणत्या ही प्रकारचा गोंधळ गडबड याचा लवलेश नसणारा या नवरात्राचे नऊ दिवस मोठा आनंदमय, भक्तिमय, प्रेमळमय वातावरणामध्ये हा उत्सव साजरा होत असतांना दिसत आहे.

विशेष म्हणजे स्त्रियांना आपल्या सासरी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करावे लागतात. मात्र नवरात्रोत्सवात रायगड जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून माहेरवाशिणी आपल्या प्रेमळ म्हणून सर्वांचीच (चंदाआई) मातेकडे म्हणजे चंदाराणी ताईंकडे येऊन मनमुराद माहेरचा आनंद लुटतात. ज्यांना आपल्या घरी आई-वडील असलेल्या आणि आई-वडील नसलेल्या माहेरवाशीणी येऊन माहेरचा आनंद लुटतात. त्यांना राहण्याची व जेवणाची सोय चंदाराणी मोफत करून त्यांना आईची माया देतात. शेवटच्या दिवशी आपल्या सासरी जाताना चंदाराणी ताईंच्या कुशीतून हुंदके देत पुढल्या वर्षी दोन दिवस अगोदरच माहेरी येण्याचे सांगून निरोप घेतात.

दर वर्षी नवरात्रोत्सवाला महालक्ष्मीचे पूजन, महाष्टमी प्रसाद,महानवमीला नवचंडी, होम-हवन व नवरात्रो स्थापना, दसरा पूजन, तसेच माहेरवाशिंना सन्मानपूर्वक आदर अशी विविधतेने नटलेल्या कार्यक्रमाची रेलचेल सुरु असते. या ठिकाणाला यापूर्वी सिनेनटी अलका कुबल,शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, मधु मंगेश कर्णिक व विविध स्तरांवरील कार्यरत असलेले भक्तगण आशा अनेकांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.