Press "Enter" to skip to content

शिवकालीन पोवड्याने समाजप्रबोधन

सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ भेंडखळ येथे उमंग भोईर यांच्या पोवाडाने श्रोते मंत्रमुग्ध

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात पोवाडा या लोक कलेला अनन्य साधारण महत्व होते. लोकजागृतीचे, समाजजागृतीचे, मनोरंजनाचे एक प्रभावी माध्यम म्हणून पोवाडा हि कला प्रचलित होती. आज हि कला/पोवाडा संस्कृती लुप्त होण्याच्या मार्गांवर आहे.मात्र अश्या शिवकालीन परंपरेचे भाग असलेले पोवाडा जिवंत ठेवण्याचे व हि प्रथा पुढे चालू ठेवण्याचे महत्वाचे कार्य श्री जरी मरी आई नवरात्रौत्सव मंडळाच्या माध्यमातून उरण तालुक्यातील भेंडखळ गावचे सुपुत्र शिवभक्त उमंग भोईर करीत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुरस्कृत आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ भेंडखळ उरणचे यंदाचे 18 वे वर्षे असून दरवर्षी विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. यंदा येथे उरण मधील प्रसिद्ध शाहीर उमंग भोईर यांच्या पोवाडाचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. यावेळी शाहीर उमंग भोईर यांनी शिवकालीन शिवरायांचे मावळे बहिर्जी नाईक यांचे मोहीम, कार्य यावर आधारित माहिती पोवाडाच्या माध्यमातून दिली. आपल्या पोवाडा द्वारे उमंग भोईर यांनी प्रेषकांना मंत्र मुग्ध केले. पोवाड्यातून श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व विचार, इतिहास सर्वांच्या डोळ्यासमोर उभे केले.

शिवकालीन पोवाडाजिवंत ठेवण्याचे कार्य उमंग भोईर करत असून विविध सामाजिक विषयावर ते जनजागृती करीत आहेत. यावेळी आदर्श सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळ भेंडखळचे कार्याध्यक्ष तथा मनसे रायगड जिल्हाध्यक्ष अतुलशेठ भगत, अध्यक्ष वैभव भगत, उपाध्यक्ष राकेश भगत, सचिव यतिश भगत, खजिनदार -जय भगत यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी सदस्य, श्री जरी मरीआई नवरात्रौत्सव मंडळाचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.