Press "Enter" to skip to content

शेकापचा रास्ता रोको

स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या टक्केवारीत रखडला रस्ता, आ. जयंत पाटील यांचा घणाघात

अलिबाग-रामराज-रोहा रस्त्यासाठी शेकापचा एल्गार, दोन तास रास्ता रोको

सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |

अलिबाग व रोहा या दोन राजकीय सत्ताना जोडणारा अलिबाग रामराज रस्त्याची आजघडीला अत्यंत भयावह दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास गाडीचा व अनुभव होडीचा अशी परिस्थिती दिसून येतंय. स्थानिक आमदार यांच्या टक्केवारीत रस्ता रखडला आहे. असा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी केला.

या मोर्चात शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी रस्ता स्वतःच्या खर्चात बनवून देणार असल्याच्या आश्वासनाची ऑडिओ क्लिप देखील वाजवली. खड्डे, दगडगोटे, चिखल यामुळे या जीवघेण्या मार्गावरून प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. सदर रस्त्याचे डांबरीकरण व मजबुतीकरण होऊन मार्ग सुस्थितीत यावा व जनतेचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा यासाठी शेेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आ जयंत पाटील यांच्या नेतृत्वात व महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या उपस्थित रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अलिबाग रोहा रस्ता आ. जयंत पाटील, तत्कालिन आमदार पंडित पाटील यांनी प्रयत्न करत 225 कोटी करुन निवीदा काढल्या. या रस्त्याची वर्क ऑडर काढली. मात्र सत्तापालट झाल्यानंतर टक्केवारीवरुन रस्ता तसाच राहीला आहे. श्रेयवाद करीत रस्त्याचे पुन्हा नारळ फोडले गेले. 40 वर्षात केला नाही असा गाजावाजा करुन सांगण्याचा प्रयत्न केला गेला. प्रत्यक्षात काम मात्र काहीच केले नाही. त्यावर आ. जयंत पाटील यांनी वर्क ऑर्डर आणत नितीन गडकरीं यांचकडे पाठपुरावा करीत निधी देखील मंजुर करुन घेतला. मात्र टक्केवारीत अडकलेल्या या रस्त्याचे काम आपण पावसाळ्यानंतर सुरु करण्याचा निर्धार जयंत पाटील यांनी केला होता. त्यानुसार शेकापक्षाने निर्णय घेत बंद पडलेले काम पावसाळा संपल्यानंतर चालु करण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे सदर काम चालु करायला भाग पाडण्यासाठी आता शेकापने आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे.

गेली पाच वर्षे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे शासन आणि स्थानिक लोक प्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत आहे.  रस्ता मंजुर आहे, निधी उपलब्ध आहे मात्र काम सुरु होत नाही या कारणामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.  रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी करीत शेकाप कार्यकर्ते आमदार जयंत पाटील आणि महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरले. शेकाप कार्यकर्त्यांनी संपूर्ण परिसर घोषणांनी दणाणून सोडला.

यावेळी बोलताना आमदार जयंत पाटील यांनी स्थानिक लोक प्रतिनिधींकडुन होणाऱ्या टक्केवारीच्या मागणीमुळे रस्ता रखडला असल्याचा आरोप केला.  शेकडो कार्यकार्यांनी सुमारे दोन तास रस्ता रोखला.  सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सुधदरे आणि ठेकेदाराने रस्ता रोको करणाऱ्या कार्यकर्त्यांची भेट घेत दिवाळी पुर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि एक वर्षात वीस किलो मिटरचा रस्ता पुर्ण करून देण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगीत करण्यात आले असुन रस्ता झाला नाहीतर उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी आ. जयंत पाटील यावेळी सांगीतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.