Press "Enter" to skip to content

रंगले शक्ती-तुर्याचे सामने

नवरात्रोत्सवात महिलांच्या शक्ती – तुरा नाचांनी आणली रंगत

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील देवकान्हे येथे संपन्न झालेल्या महिलांच्या शक्ती-तुरा नाचांनी चांगलीच रंगत आणून रसिक प्रेक्षकांचेही चांगलेच मनोरंजन झाले.

देवकान्हे येथील गावदेवी मंदिराचे प्रांगणात नवरात्रौत्सवानिमित्त देवीच्या उत्सवासाठी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते राजेश सुटे व रोठ बु.येथील माजी सरपंच ज्ञानेश्वर साळुंखे यांनी पुरस्क्रुत केलेल्या व ग्रामस्थ मंडळ व तरूण मंडळ देवकान्हे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शक्ती-तुरा नाचाचे सामन्या प्रसंगी बाबूराव बामणे, प्रकाश कान्हेकर,विठ्ठल बामुगडे, भिकू सुटे,संतोष कोंडे,विजय कान्हेकर, बाळू आगळे,संतोष ग.कोंडे,विजय कान्हेकर, सुधाकर जवरत,प्रदीप जवरत,अनिल सुटे,हरिश्चंद्र टिकोणे, वसंत बामुगडे, एकनाथ मोहिते,मारूती कान्हेकर, चंद्रकांत बामुगडे, जितेंद्र कान्हेकर, शंकर बामुगडे, हिराजी घरट,अनिल सुटे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

महिला मंडळ नाचाचे सामन्यात दोन्ही बाजूकडील शाहीरांनी विविध शैलीतून आपली कला सादर करून बहारदार गाणी गायल्याने तसेच दोन्हीकडून चाललेली चढाओढ आणि उत्तराला प्रतिउत्तर नाचाचे सामना पाहताना रसिकवर्गही चांगलाच मंत्रमुग्ध झाला होता.शक्तीवाले महिला मुंढाणी-पेण व तुरेवाली महिला वणी-रोहा यांच्यात रंगतदार महिला मंडळाच्या नाचाचे सामने संपन्न करण्यात आले होते.

सध्याच्या परिस्थितीत शक्ती-तुरा ही लोककला काळाच्या पडद्याआड होत असतानाच वणी व मुंढाणी येथील महिला नाच मंडळाने ही परंपरा जतन करून व कलेच्या प्रचार व प्रसार व्हावा यासाठी घेत असलेल्या मेहनीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होताना दिसत आहे. तर येथे संपन्न झालेल्या या ना मंडळाने विविध ढंगात व विविध रंगात तसेच शाहिरी जलशात आपली कला पेश केल्याने रसिकवर्गही बेहद खुश होऊन त्यांनी आयोजकांना धन्यवाद दिले. .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.