Press "Enter" to skip to content

नवरात्रोत्सव २०२१

नवसाला पावणारी रोठची आई भवानी माता

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |

रोहे तालुक्यातील रोठ खु.येथील आई भवानी माता एक जाग्रुत देवस्थान म्हणून ओळखले जाते तसेच ही देवी नवसाला पावते अशी समस्त भाविकांची गाढ श्रद्धा असून याची प्रचिती प्रत्येक भक्ताला वेळोवेळी आलेली आहे.

निसर्गाच्या सान्निध्यात व कुंडलिका नदी तिरावर प्रशस्त जागेत भवानी मातेचे सुंदर व देखणे असे मंदिर गावाच्या नावलौकिकात भर घातले.भवानी मातेचे सुंदर मंदिर पाहताच भक्तांचे मन देखील प्रसन्न होते.मंदिराच्या आत प्रशस्त सभा मंडप व त्या पुढील गाभाऱ्यात भवानी माता स्थानापन्न झाली आहे.मंदिराचे उंचच उंच कळस मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलवितात.

रोहे तालुक्यासह समस्त रायगड जिल्ह्यात रोठची भवनी माता एक जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्धीस पालल्याने नवरात्रोत्सव काळात येथे दूरवरून भाविक भक्त व भगिनी मोठ्या संख्येने येतात.या नऊ दिवसाचे कालावधीमध्ये मंदिर परिसराचे करण्यात आलेले सुशोभीकरण तसेच मंदिरात संपन्न होत असलेले धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम तसेच सामाजिक प्रबोधनपर व मनोरंजक कार्यक्रमामुळे गावामध्येही उत्साहाचे व मांगल्याचे वातावरण निर्माण होते.

आमची भवानी माता भक्तांचा हाकेला धावणारी व मनोकामना पुर्ण करणारी देवी म्हणून मातेची ख्याती असल्याने नवरात्रात मोठ्या संख्येने भाविक भक्त येथे नवस फेडण्यासाठी व दर्शनासाठी येतात तर वर्षभरही भाविक भक्तांची येथे रांग लागलेली असते.तर या संपूर्ण सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी ग्रामस्थ, महिला मंडळ व तरूण मंडव तसेच नवरात्रोत्सव कमिटी मंडळ मोलाचे सहकार्य करित असल्याबाबतची माहिती मंदिरिचे पुजारी श्री.सचिन मोरे यांनी दिली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.