Press "Enter" to skip to content

जेनेरिक औषधे म्हणजे काय ?

जाणून घ्या जेनेरिक औषधे म्हणजे काय ? वाचा जेनेरिक औषधांविषयीचे समज गैरसमज !

सिटी बेल | आरोग्य कट्टा | संतोष घोडींदे |

जेनेरिक म्हणजे स्वस्त. खरेतर जेनेरिक म्हणजे विशिष्ट छाप नसलेले, सामान्यनाम दूध हे जेनेरिक नाव तर गोकुळ दुध, वारणा दुध, चितळे दुध हे विशेष नाम किंवा ब्रँड नेम. औषधांच्या बाबतीत जो औषध शोधून काढतो आणि बाजारात आणतो त्याने प्रचंड खर्च केलेला असतो. औषध शोधण्यावर आणि त्यापेक्षा कित्येक पट जास्त खर्च त्याच्या चाचण्याकरून घेण्यास लागतो. नंतर ते एफ. डी. ए. कडून मान्यताप्राप्त करण्यात येते. आता हे औषध पूर्ण विकसित झाले की ते बाजारात विकून खर्च वसूल करून वर नफा कमवून पुढे पुन्हा नवीन संशोधन करण्यास प्रोत्साहन मिळावे म्हणून या औषधाचे पेटंट मिळते ते साधारण २० वर्षासाठी पेटंट घेताना औषध बनविण्याची पद्धत ही जाहीर करावीच लागते. नंतर ती कोणालाही उपलब्ध होऊ शकते. दुसरे कोणी कसलेही सोपस्कार पूर्ण न करता तीच पद्धत वापरून बाजारात औषध आणू शकते. ते सुद्धा अत्यंत स्वल्प दारात. कारण शोधण्याचा आणि चाचण्यांचा खर्च शून्य असतो अशा नकलाकारांसाठी म्हणून मूळ शोधकाला पेटंट दिले जाते, ज्यामुळे इतर कोणीही ते औषध बनवून विकू शकत नाही. यामुळे औषधाची किंमत खूप जास्त राहते. एकदा का पेटंट संपले की इतर कोणीही तीच पद्धत वापरून, तेच औषध बनवून विकू शकते आणि ते सुद्धा जवळजवळ ८० ते ८५% कमी किंमत लावून. अशा ज्या मूळ पेटंट संपल्यानंतर, औषधाच्या प्रतिकृती बाजारात येतात त्याला जेनेरिक असे नाव आहे. बऱ्याचदा जेनेरिक औषधे ही मूळ औषधाइतकीच उपयुक्त असतात. जगात अनेक देशात औषधांच्या किमती इतक्या महाग असतात की त्या बहुतेकांना परवडत नाहीत. म्हणूनच जेनेरिक औषधे खूप हवीहवीशी असतात. अमेरिकेत जवळजवळ ८० % औषधे जेनेरिक असतात.

आपल्याकडील बहुतेक औषधे जेनेरिक आहेत. ही औषधे मोठ्या कंपन्या आपले नाव लावून ती विकतात. अगदी अभावानेच एखादी भारतीय कंपनी स्वत: शोध लावलेले औषध विकत असते. यांना ‘ब्रँडेड जेनेरिक’ म्हणतात. या सर्व कंपन्या हे औषध बनवतात त्यात दोन भाग असतात.

१] ऍक्टीव्ह फार्मा इन्ग्रेडिएन्ट + (Active Pharmaceutical Ingredient) * (एपीआय) मूळ औषध.

२] इतर पदार्थ • Excipients* मूळ औषधाला सेवनयोग्य करण्यासाठी वापरलेले इतर पदार्थ.

एखाद्या औषधाचा डोस समजा ५०० मि.ग्राम असेल तर त्या औषधाची गोळी कशी बनणार आणि ती पॅक कशी करणार? बरीच औषधे तर ०.२५ अशा डोसमध्ये पण असतात त्यांचे काय? म्हणून वेगवेगळे इतर पदार्थ (Excipients) एकत्र करून साधारण एक ते चार ग्रॅम वजनाची गोळी किंवा 30 मिली, 60 मिली, 100मिली औषधे बनवावी लागतात. आपल्याकडील बहुतेक सर्व मोठ्या कंपन्या ज्या ‘ब्रँडेड जेनेरिक’ विकतात त्या मूळ औषध किंवा एपीआय कुठच्यातरी छोट्या कंपनीकडून तयार करून घेतात. मग ते मूळ औषध (API) आणि इतर पदार्थ (Excipients) एकत्र करून विकण्यायोग्य औषध बनते. आता या औषधात इतर (Excipients) पदार्थाचे काम काय ते पाहूया. दर्जा वाढविणे हे मुख्य काम. त्याच सोबत मूळ औषधाला ‘गुंडाळणारे आवरण’ (Coating) हे खूप महत्त्वाचे काम आहे. औषधाची उपयोगिता कमी होत जाते ती त्याचा संपर्क पाणी (आर्द्रता), प्रकाश वा प्राणवायू या तीन ‘प कारांच्या’ संपर्कात आल्याने आवरण जितके उत्कृष्ट तितके ते औषध जास्त काळ आपली उपयुक्तता टिकवून ठेवू शकते. शेवटी या प-कारांपुढे हे आवरण शरण जाते आणि औषधाची उपयोगिता कमी होऊन संपुष्टात येते. म्हणून तर औषधाला एक्सपायरी डेट असते. तसेच त्या औषधांची Bioavailability टिकविण्यासाठी या इतर योग्य (Excipients) पदार्थांची गरज असते. ‘मियां मूठभर दाढी हातभार’ म्हणतात त्या प्रमाणे बऱ्याचदा मूळ औषधापेक्षा या इ ( Excipients ) पदार्थांची कीमत खूप जास्त असते वा वेगवेगळी असते.

अनेकदा असे म्हटले जाते की सगळ्याच कंपन्या अगदी स्वस्तात ‘जेनेरिक’ औषधे विकणाऱ्या कंपन्या देखील एकाच ठिकाणाहून मूळ औषध बनवून घेतात. मोठ्या कंपन्या ब्रँडच्या नावाखाली पैसे उकळतात असे आपण मानतो. मूळ औषध त्याच ताकदीने १८ महिने उपयोगी पडावे म्हणून उत्तम आवरण आवश्यक असते. इथेच स्वस्त औषधे बनवून विकणाऱ्या कंपन्या पैसे वाचवतात.

आवरणासोबत आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे विघटन करणारे पदार्थ. कारण जिथे हवे तिथे हे आवरण जर विघटित झाले नाही तर औषधाचा उपयोग होत नाही. काही औषधे जिभेखाली, तर काही जठरात तर काही अगदी आतड्यात मोकळी व्हावी लागतात. ती जर आधी किंवा नंतर विघटित झाली तर आम्ल किंवा अल्क अशा रसांमुळे मूळ औषध शोषले जाण्याऐवजी संपवले जाऊ शकते. या विघटन करणाऱ्या पदार्थाच्यात पण खूप किंमत वाचवता येऊ शकते; पण दर्जा आणि उपयुक्तता यांना तिलांजली देऊनच.

अशा अनेक तांत्रिक गोष्टी आहेत ज्यामुळे मूळ औषध समान असताना किमतीत फरक असू शकतो. जर या सर्व गोष्टी समान असतील तर कमीतकमी किमतीला मिळणारे जेनेरिक औषध मिळणे हा प्रत्येकाचा हक्क आहे. परंतु काही जेनेरिक औषधे कंपन्या अधिक MRP छापुन ही स्वस्त औषधे बाजारात आणते व काही औषधे विक्रेते ती डिस्काउंट च्या नावाखाली विकून रुग्णांची लूट करतात. कमी प्रतीची प्रतिजैविके ( ANTIBIOTICS) वापरून रुग्णालयातील मुक्काम खूप वाढू शकतो. तसेच अयोग्य रीतीने प्रतिजैविके (ANTIBIOTICS) वापरण्याने पेशी प्रतिजैविक औषधांना दाद देण्याचे बंद होतात. Drug Resistant Superbugs तयार होण्यासही अशा अनेक गोष्टी जबादार असाव्यात. तेव्हा फक्त औषधच नव्हे तर त्यासोबत येणाऱ्या सर्व गोष्टी या मूळ चाचण्यांनी सिद्ध झालेल्या औषधासारख्याच असल्या तर मग जेनेरिक औषधे लिहा अशी सक्तीच काय विनंती पण करावी लागणार नाही. परंतु दुर्दैवाने अशा चाचण्या करून सर्व औषधे समान आहेत हे तपासून पाहणारी सक्षम यंत्रणा आपल्याकडे कमी आहे. तीच्यात वाढ व्हावी म्हणून खरेतर सगळ्यांनी प्रचंड दबाव आणायला हवा. नाहीतर ब्रँड नको म्हणून आपण आपलेच नुकसान करून घेतो.

आज आपल्या देशात अनेक जेनेरिक कंपन्याची चांगली औषधे कमी MRP मध्ये उपलब्ध आहेत त्या मुळे रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना नम्र विनंती की फा डिस्कोउंटच्या मागे न लागता कमीत कमी MRP असलेली दर्जेदार जेनेरिक औषधे खरेदी करा व त्यांचा सुयोग्य वापर करा. आपल्याकडे पैसे घेणारा जबाबदारी पण घेतो ही कल्पना रुजलेली नाही. परिस्थितीमुळे आज पेशंट्स किंवा त्यांचे नातेवाईकांकडून दर्जापेक्षा डिस्काउंट किमतीचा आग्रह धरला जातो, ही आपली जेनेरिक धारणा असावी. ती बदलली तर आपण दर्जेदार जेनेरिक्ससाठी आग्रह धरू जो आपला सर्वांचा हक्क आहे आणि गरजही.

आपल्या देशात औषध दर नियंत्रण (DPCO) कायदा आहे. अनेक अत्यावश्यक औषधांच्या किंमती या कायद्यामुळे नियंत्रणात आहेत. या कायद्या अंतर्गत सर्वच जेनेरिक औषधांची MRP देखील नियंत्रित करता येऊ शकेलं अशी मला आशा वाटते. नुकतीच पुण्यातील काही वकिलांनी या जेनेरिक औषधांच्या किंमती (MRP) कमी करण्यासाठी याचिका दाखल केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.