Press "Enter" to skip to content

तळोज्यात अग्नीतांडव

तळोजा औद्योगिक वसाहतीतील केमस्पेक कारखान्यात भिषण आग : अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

तळोजा एमआयडीसी मधील केमस्पेक या केमिकल कारखान्याला आज सायंकाळी ५.३० च्या सुमारास भीषण आग लागली .
या आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही .

घटनास्थळी अग्निशामक दल पोलीस प्रशासन यांनी उपस्थित राहून या कंपनीची आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नसलेतरी वारंवार या कारखान्यात अशा आगीच्या घटना घडत आहेत. तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या कारखान्यांमधील केमिकल कारखान्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहे.

सूत्रांच्या मिळालेल्या माहिती नुसार रसायन मिश्रीत प्रक्रिया सुरू असताना अशाप्रकारच्या आगीच्या घटना घडत असतात. मात्र वारंवार अशा भीषण आगीच्या घटना घडण्याचे नेमके कारण काय ? हा प्रश्न उपस्थित होत असून यामुळे तळोजा औद्योगिक वसाहतीत परिसरात असलेल्या आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या जीवा चा मोठा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.