Press "Enter" to skip to content

पतसंस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन

जय भवानी पतसंस्थेच्या नवीन कार्यालयाचे अध्यक्ष जे.टी.पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे | 

भवानी ग्रामीण बिगर शेती सहकार्य पतसंथा मर्या. भुवनेश्वर रोहा ही पतसंथा सामाजिक बांधिलकीची जपणूक करत २५ व्या वर्षाकडे वाटचाल करीत असताना संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा चढता आढावा निश्चितच अभिमान स्पंद असून पतसंस्थेने सभासद ग्राहक कर्जदार ठेवीदार यांच्या विश्वासास पात्र ठरली आहे. भविष्यात पतसंस्थेच्या निश्चित चढता आलेख राहील. असे प्रतिपादन रायगड जिल्हा सहकारी पतसंथांचा महासंघ मर्यादित अलिबाग अध्यक्ष अॅड.जे टी पाटील यांनी जय भवानी पतसंस्थेच्या नवीन कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी आपल्या भाषणात व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी पी बी सरफळे होते. उपाध्यक्ष शंकरराव भगत, कोषाध्यक्ष अॅड.सुनील सानप, सचिव उदय मोरे, उपस्थित होते.

अॅड.जे टी पाटील पुढे म्हणाले कि सहकार कायदा १९६१ अधिनियम १९६० फारच जुने अधिनियम असल्यामुळे त्यामध्ये दुरुस्तीकरून सुधारित नियम करण्याचे काम हाती घेण्यास येणार आहे. या मधील पतसंस्थेच्या हिताच्या दृष्टीने ज्या दुरुस्त्या आवश्यक आहेत. त्या मी स्वतः राज्यस्तरावर सुचविणारे आहे. त्या सुधारणा मध्ये संस्थेचे अध्यक्ष सरफळे यांनी जे सुचविले आहे . पतसंथांमध्ये महिलांसाठी ५० % राखीव जागा कराव्या यावर यांनी सांगितले ३३ % राखीव जागा महिलांसाठी करता येतील असा शासन दरबारी प्रयत्न करील असेल आश्वासन दिले भविष्यात पतसंस्थेचा कारभार अधिक पारदर्शक होण्यासाठी डिजिटल व कॅशलेस व्यवहार होतील . त्यामुळे हे नवीन कार्यालय संस्थेच्या कारभारासाठी पुरेशे व अति उत्तम रोहे शहरातील कार्यालय आहे. पतसंस्थेच्या सर्वच संचालक मंडळाच्या कारभाराचे व त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचे कौतुक केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.