Press "Enter" to skip to content

व्याख्यान शिबीर संपन्न

विद्यार्थीनींसाठी “तारुण्याच्या वाटेवर” या विषयावर व्याख्यान शिबीर

सिटी बेल | उरण | वैशाली कडू |

नवदुर्गा नवरात्रौत्सव मंडळ, बोरी आणि यु.ई.एस. स्कूलच्या संयुक्त विद्यमाने ज्युनिअर व सिनीअर कॉलेजच्या विद्यार्थीनींसाठी “तारुण्याच्या वाटेवर” या विषयावर व्याख्यान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं.

यावेळी यु.ई.एस.चे अध्यक्ष आर्किटेक्ट तनसुख जैन, माजी अध्यक्ष व सदस्य ॲडव्होकेट राजेंद्र भानुशाली, सिनिअर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या सौ. सोनाली म्हात्रे, स्कूल व ज्यु. कॉलेजच्या प्राचार्या सौ. सिमरन दहिया, माध्यमिक, प्राथमिक व पुर्व प्राथमिक विभागाच्या पर्यवेक्षिका, सिनिअर कॉलेजच्या एचओडी तसेच ‘राष्ट्रीय सेवा योजना’ कार्यक्रम अधिकारीआणि ज्युनिअर व सिनीअर कॉलेजच्या विद्यार्थीनी, शिक्षक व कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. पराग कारोळकर (केडीएस कॉलेज उरण), त्यांच्यासोबत डॉ.माधवी गोसावी (चाईल्ड केअर कन्सलटंट, उलवे) , श्री. अतुल ठाकुर (नवदुर्गा नवरात्रोत्सव मंडळ अध्यक्ष व नगरसेवक), श्री.नंदन पानसरे, श्री.संतोष पवार व इतर पदाधिकारी ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ.माधवी गोसावी ह्यांच्या भाषणाने झाली. ज्यात त्यांनी विद्यार्थीनीना आपल्या अनुभवाचे बोल सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. पराग कारोळकर ह्यांनीही खुमासदार शैलीत तारुण्याच्या वाटेवरच्या महत्त्वाच्या गोष्टी विद्यार्थीनींना उलगडून सांगितल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. योगिता चौधरी तर आभार प्रदर्शन नैना सिंग यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.