Press "Enter" to skip to content

बौद्ध धम्म समितीच्या कार्यास प्रारंभ

भारतरत्न डॉ.बाबासाहेबांना अभिवादन करीत बौद्ध धम्म समितीच्या कार्यास प्रारंभ

समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी कार्यरत राहणार : पंकज तांबे

सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |

माणगांव येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज तांबे यांनी स्थापन केलेल्या बौद्ध धम्म समितीच्या कार्यास चवदार तळे भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन प्रारंभ करण्यात आला .

बहुजन समाजाच्या शैक्षणिक , आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी या संस्थेच्या माध्यमातून आपण कार्यरत राहणार असल्याचे पंकज तांबे यांनी यावेळी बोलताना सांगितले . बहुजन समाजातील एक मोठा घटक आजही शैक्षणिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीपासून वंचित आहे . समाजासाठी शासनाच्या विविध योजना आहेत . मात्र या योजना समाजापर्यंत पोहोचत नसल्याने प्रगती साधता येत नाही . या योजना सामान्य माणसापर्यंत केवळ पोहोचवायचे नाही तर प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याचे काम आपली संस्था करील , असा विश्वास तांबे यांनी या वेळी दिला . केवळ रायगड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात संस्था काम करणार असल्याचे ते म्हणाले . याचबरोबर बहुजन समाजातील युवक युवतींना प्रशासनान काम करण्याची संधी मिळावी यासाठी यूपीएसस , एमपीएससी , बँकिंग अशा विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन संस्थेमार्फत करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले .

या संस्थेचे काम भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करूनच सुरु करण्याची आपली भावना होती . त्यासाठीच आज आपण महाडच्या या क्रांतीभूमीत आलो असे त्यानी सांगितले. त्यांच्यासमवेत संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्नील शिर्के आणि सरचिटणीस संभाजी गायकवाड उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.