Press "Enter" to skip to content

नवरात्रोत्सव २०२१

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठीजुई येथे नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंग रंगात नहाल्या सरस्वतीच्या लेकी

सिटी बेल | उरण | अजय शिवकर |

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोठीजुई ता.उरण या शाळेत अनुभवांतून शोधू या विज्ञानाचे झरे कार्यक्रमांतर्गत
किशोरी आहार कोष या उपक्रमाबरोबर नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून नऊ दिवसाचे नऊ रंग रंगात नहाल्या सरस्वतीच्या लेकी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सुरुवातीला विद्येची देवता माता सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तदनंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे व दुर्गादेवी जे रूप साकारलेल्या शाळेतील विद्यार्थिनींचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.विद्यार्थिनींना वेगळ्या रंगात वेगळ्या ढंगात पाहून व त्यांचा प्रतिसाद व त्यांच्या चेहऱ्यावरील उमलणारे हास्यच खऱ्या नवरात्रीच्या नवदुर्गचे रूपच अनुभवायला मिळाले.

या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर पाटील, उपाध्यक्षा क्रांतिताई पाटील,सदस्या वैशाली पाटील शाळेचे मुख्याध्यापक सुभाष म्हात्रे,शाळेतील महिला शिक्षिका रंजना म्हात्रे,शर्मिला पाटील, श्रीमती ज्योती बामनकर तसेच शिक्षक संजय होळकर, दर्शन पाटील, संदीप गावंड, यतीन म्हात्रे, अंगणवाडी ताई हेमंती भोईर ,जयवंती पाटील,रजनी कैकाडी, नागुबाई कामोठकर,भाविका कामोठकर,रेखा पाटील व सर्व नवदुर्गा विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

किशोरी आरोग्यकोष या कार्यक्रमात मार्गदर्शन करणाऱ्या रंजना म्हात्रे यांनी मुलींचे आरोग्य वयानुरूप शारीरिक हालचाली शारीरिक बदल इत्यादीबाबत सखोल असे मार्गदर्शन केले. त्यानंतर आशा शिवानी भोपी यांनी वयोगटानुसार शारीरिक बदल त्यासाठी सुयोग्य आहार व मुलींच्या मनातील भीती कशी नाहीशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. तर शाळेच्या या उपक्रमाच्या प्रमुख शर्मिला पाटील मॅडम यांनी मासिक धर्म गूड टच बॅड टच इत्यादीबाबत सखोल मार्गदर्शन केले.शालेय इयत्ता 5 वी ते 7 वी पर्यंतच्या मुलींच्या आरोग्याबाबत असणारी भीती कशी नाहीशी करता येईल यासाठी करावयाच्या उपाययोजना व घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष म्हात्रे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शाळेचे शिक्षक संजय होळकर सर यांनी केले यापूर्वी देखील या शाळेत कोरोना काळातील विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढण्याबरोबर विद्यार्थ्यांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी व त्यांचे मन शाळेत रमावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.व यापुढेही राबविण्यात येतील असे मत शाळेचे विविध उपक्रम राबविणारे उपक्रमशिल शिक्षक संजय होळकर यांनी सांगितले. आतापर्यंत शाळेच्या विविध उपक्रमाचे ज्या ज्या वृत्तपत्राने दखल घेतली त्या सर्व वृत्तपत्राचे संपादक व पत्रकार बंधु यांचेही शाळेच्या वतीने मन:पूर्वक आभार मानण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.