Press "Enter" to skip to content

नवरात्रोत्सव २०२१

जय अंबे नवरात्रोत्सव मंडळ पाले येथे दुर्गा उत्सव

सिटी बेल | पाले | अमर म्हात्रे |

जय आंबे नवरात्रोत्सव मंडळ पाले गेली २२ वर्ष या दुर्गामतेची मनोभावे उपासना केली जाते अनेक सामाजिक,सांस्कृतिक क्रीडा उपक्रमांनी सजविलेल्या या मंडळाचे उपक्रम हे प्रेरणादायी असतात परंतु या कोरोना महामारी च्या काळात सर्व शासकीय नियम पळून हा दुर्गा उत्सव शांततेचा मार्ग अवलंबून साजरा केला जात आहे.

या वर्षी मंडळाने केलेला संकल्प देखील खूप प्रेरणादायी आहे. म्हणजे देवी उपासने साठी ज्या नवविधा भक्ती साठी देवीची ओटी भरण्यासाठी ज्या साडी येतात त्या गोर गरीब व गरजू लोकांना देण्यासाठी अनोखा संकल्प या मंडळाच्या सदस्या ने केला आहे. दरवर्षी दुर्गामतेच्या दर्शनासाठी या पंचक्रोशीतील अनेक मान्यवर हे मनोभावे भेट देत असतात.

जय अंबे दुर्गामतेची सर्व सभासद वर्ग येणाऱ्या पाहुण्यांचा आदरातिथ्य मोठ्या श्रद्धेने करत असतात मंडळाचे अध्यक्ष अजित म्हात्रे,उपाध्यक्ष गोरक्ष म्हात्रे, खजिनदार चेतन पाटील, सह खजिनदार हरिष म्हात्रे,सेक्रेटरी प्रफुल्ल म्हात्रे, कार्याध्यक्ष जीवन म्हात्रे आणि अनेक सभासदांना विश्वात घेऊन आज 22 वर्ष हे मंडळ कार्यरत आहे.

आज या देवीच्या दर्शनास गेलेल्या साईकृपा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चे राकेश पाटील सर, सुयश क्लासेस चे निवास गावंड सर सारडे विकास मंच अद्यक्ष नागेंद्र म्हात्रें ,कार्याध्यक्ष रोहित पाटील , प्रितेश म्हात्रें आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी यांच्या स्वागता नंतर आपल्या साड्या वाटपाचा संकल्प सारडे विकास मंच च्या आयोजनातून करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे नक्कीच आई भवानी तो पूर्ण करील अशी आशा आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.