Press "Enter" to skip to content

अपघात रोखण्यासाठी प्रयत्न

उरण मधील अपघात रोखण्यासाठी भाजपचा पुढाकार : भाजपतर्फे विविध उपाययोजना संदर्भात निवेदन

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

उरण तालुक्यात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT )हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुप्रसिद्ध बंदर असल्याने उरण तालुक्यातील पूर्व विभागात विविध कंपनी, सीएफएस गोडावून, कॅन्टेनर यार्ड यांचे जाळे खूप मोठ्या प्रमाणात आहेत. उरण तालुक्यातील पूर्व विभागात असलेल्या कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.मुख्य रस्त्यावरून वाहने वळवीताना गाडीवर क्लीनर नसणे, मुख्य रस्त्यावर तसेच अपघात होणाऱ्या महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नसणे, मुख्य रस्त्याच्या वळणाच्या ठिकाणी लाईटची सुविधा नसणे हे अपघात होण्याची मुख्य कारणे आहेत.ह्या कारणांचा विचार करून भारतीय जनता पार्टी पूर्व विभागाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यासंदर्भात विद्यमान आमदार महेश बालदी, तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, ग्रामपंचायत खोपटे (बांधपाडा )आदी ठिकाणी पत्रव्यवहार करून निवेदन देण्यात आले आहे.

प्रत्येक कपंनीच्या मुख्य रस्त्याच्या वळणावर हायमास बसविणे, मुख्य रस्त्याच्या वळणावर कायम स्वरूपी सुरक्षा रक्षक नेमणे, कंपनीत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनावर ड्रायवर सोबत क्लीनर ठेवणे बंधनकारक करावे अशा मागण्या तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, आमदार महेश बालदी यांना तसेच संबंधित विभागाकडे करण्यात आले आहे. संबंधित समस्या संदर्भात भाजपा पूर्व विभाग ने केलेल्या मागणीचा विचार करून संबंधित कंपनी व्यवस्थापनाकडून तातडीने अमलबजावणी करण्यासाठी कंपनी प्रशासनाला सूचना देण्यात येतील. अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन विद्यमान आमदार महेश बालदी यांनी दिले.तर अपघात रोखण्यासाठी सर्वतोपारी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी सांगितले.

उरण मध्ये अनेक अपघात होत आहेत. त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाल्याने सदर निवेदन कंपनी प्रशासन, शासकीय विभाग, तहसीलदार, आमदार यांना देण्यात आल्याचे भाजपा चिरनेर पंचायत गण अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. यावेळी भाजपा चिरनेर पंचायत गण अध्यक्ष प्रशांत ठाकूर, भाजपा कोप्रोली विभाग अध्यक्ष शशी पाटील, बांधपाडा सरपंच विशाखा ठाकूर, विभाग अध्यक्षा सुगंधा कोळी, खोपटा युवा अध्यक्ष हेमंत ठाकूर, सदस्य अच्युत ठाकूर, सदस्य संदेश म्हात्रे, सदस्या मिनाक्षी म्हात्रे, सदस्य देवानंद पाटील, प्रितम ठाकूर, परेश पाटील, ज्ञानदीप ठाकूर, जयेश ठाकूर, चंद्रहास ठाकूर, अमित घरत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.