Press "Enter" to skip to content

हातभट्टी अड्डांवर कारवाई

रसायनी पोलिसांची गैरकायदा गावठी हातभट्टी अड्डांवर कारवाई सुरूच : वाशिवली डोंगराळ भागातील अड्डा उध्वस्त, दोन महिन्यांत पाचवी कारवाई

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिसांनी शिताफीने छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा अड्डा उध्वस्त केला आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मंगेश लांगी,नंदन पाटील, जयवंत बैकर, महिला पोलिस नाईक प्रिया कांबळे यांनी कारवाई केली.

यात बेवारस स्थितीत मिळून आलेले 200 लिटर क्षमतेचे 5 प्लास्टिक ड्रम ,200 लिटर क्षमतेचे 3 पत्राच्या टाक्यांमध्ये व 100 लिटर क्षमतेच्या 1 प्लास्टिकच्या ड्रममध्ये तांबड्या रंगाचे उग्र वास येत असलेले एकूण 1700 लिटर रसायन मिळून आले.सदरील रसायन जागीच ओतून नाश करून 6 प्लास्टिकचे ड्रम जाळून नष्ट केले.व 3 पत्र्याच्या टाक्या तोडून नुकसान केले आहे.

रसायनी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक पदावर कैलास दादाभाऊ डोंगरे यांनी पोलिस ठाण्याचा कार्यभार सांभाळताच गैरकायदा हातभट्टी अड्डे उध्दव करण्यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.